Safran
Safran  Saam TV
महाराष्ट्र

Safran Project: चाललंय काय? आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर? सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : राज्यातून एकामागून एक प्रकल्प परराज्यात जात आहेत. या मुद्द्यावरुन आधीच राजकारणार तापलेलं असताना आता आणखी एक प्रोजेक्ट राज्याबाहेर गेला असल्याची माहिती समोर येत आहे. वेंदाता, बल्क ड्रग पार्क, टाटा एअर बस प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. अशात आता फ्रान्सच्या सॅफ्रॉन ग्रुपचा प्रोजेक्ट नागपूर मिहानमधून हैदराबादला जात असल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्राचा डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकास करण्याचे स्वप्न यामुळे भंग होऊ शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार, विमान आणि रॉकेट बनवणारी फ्रेंच कंपनी SAFRAN प्रथम नागपुरातील मिहानमध्ये येण्यास इच्छुक होती. यामध्ये 1185 कोटींची गुंतवणूक होणार आहे. मात्र आता सरकारच्या दिरंगाईमुळे ते हैदराबादला स्थलांतरित होत आहे. मात्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Latest News )

सॅफ्रन ग्रुपने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (एमएडीसी) ही जागा घेण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र जागा मिळण्यास विलंब होत असल्याने हा प्रकल्प हैदराबादला जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी सॅफ्रन ग्रुपचे सीईओ ऑलिव्हियर अँड्रेस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. मग महाराष्ट्रात जागेअभावी हा प्रकल्प हैदराबादला गेला.

आज मिहान, नागपूर येथे टाटा फ्लोअर बीम, रिलायन्स-डसॉल्ट फाल्कनसाठी उपकरणे तयार करण्याशी संबंधित कंपनी कार्यरत आहे. एअर इंडिया आणि इंदमार कंपन्या एमआरओ विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करत आहेत. या चार युनिट्सशिवाय, गेल्या काही वर्षांपासून डिफेन्स एव्हिएशनशी संबंधित एकही मोठी कंपनी येथे आलेली नाही. येथे येऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना जागा मिळत नाही, ही बाब गंभीर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK, T20 WC 2024: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? समोर आलं चिंता वाढवणारं कारण

EAC-PM Report : लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकसंख्येच्या अहवालावरून राजकारण तापलं; रिपोर्टमध्ये नेमकं आहे तरी काय?

Breaking News: इराणच्या ताब्यातून ५ भारतीय खलाशांची सुटका; भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

Sharad Pawar News | राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनकरणावर शरद पवार यांचे मोठे विधान

Health Tips: महिनाभर लसून कांदा नाही काल्यास शरीरात दिसतील 'हे' बदल

SCROLL FOR NEXT