buldhana, buldhana crime news saam tv
महाराष्ट्र

Crime News : शेतकऱ्याचे लाख रुपये चाेरण्याचा प्रयत्न फसला; तीन महिलांवर गुन्हा दाखल

तिन्ही महिलांचा पाेलिस शाेध घेताहेत.

संजय जाधव

बुलडाणा : मेहेकर येथील स्टेट बँकेत (Bank) शेतकरी (Farmer) पैसे काढण्याकरिता गेला होता. तेव्हा त्या शेतकऱ्याच्या पाठीशी एक महिला उभी राहिली व हातचलाखीने शेतकऱ्याच्या हातातील कापडी पिशवी ब्लेडच्या मदतीने कापली व पिशवीतील एक लाख रुपये चोरले. जेव्हा शेतकऱ्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने त्या महिलेले हटकले व तिची तपासाणी करायला लागला. तिने पटकन हातातील पैसे खाली जमिनीवर टाकून दिले. मी घेतलेच नाही असे सांगू लागली. शेतकऱ्याने ते पैसे उचलले व तब्यात घेतले. त्यामुळे शेतक-याला स्वतःचे एक लाख रुपये मिळाले. या घटनेनंतर संबंधित शेतक-याने पाेलिसांत धाव घेतली. (Buldhana Crime News)

हा चोरीचा सर्व प्रकार बँकेत लावलेल्या सिसिटीव्हीत देखील कैद झाला आहे. या प्रकारामुळे बँकेत गोंधळ झाला. त्याचवेळी संबंधित महिलेने तेथून पळ काढला. शेतकऱ्याने मेहेकर पोलिसात (police) तक्रार केल्यानंतर पोलीसांनी महिलेचा शोध सुरु केला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रियंका प्रदीप सिसोदीया (रा.कडिया, ता.पाचौर, जि.राजगड, राज्य मध्यप्रदेश), तसेच मिनाक्षी कुंदन सिसोदीया, मनिषा राका सिसोदीया (रा. कडिया, ता.पाचौर, जि. राजगड, राज्य मध्यप्रदेश) या तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही महिलांचा शाेध सुरु असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : सोशल मीडियावर बंदी, तरुणांचा उद्रेक, सैनिकांचा गोळीबार; कोणकोणत्या २६ अॅप्सवर बंदी? वाचा यादी

Manoj Jarange: मराठ्यांनी 96 टक्के लढाई जिंकली; मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवालीत जल्लोष|VIDEO

Asia Cup 2025 : आशिया चषकाचा थरार, भारताचा पहिला सामना कधी अन् कुठे? प्लेईंग ११, सर्व माहिती एका क्लिकवर

Crime: भाच्याच्या प्रेमात वेडी झाली, मामीने नवऱ्याला जिवानीशी संपवलं; मृतदेह खाटेसह जमिनीत पुरला नंतर...

Fast Charging: स्मार्टफोनसाठी फास्ट चार्जर सुरक्षित आहे की नाही? वाचा बॅटरीसाठी होणारे फायदे आणि तोटे

SCROLL FOR NEXT