महाराष्ट्र

माजी नगरसेविकापुत्राच्या दुचाकीने घेतला तरूणाचा बळी

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई-विरार ः मुंबई शहरासह उपनगरात धूमस्टाईल दुचाक्या दामटल्या जातात. त्यावर पोलिसांचा वॉच असला तरी हे धूमखोर लोकांच्या जीवावर उठले आहेत. काल एका नगरसेविकेच्या मुलाच्या वाहनाने एका उमद्या तरूणाचा बळी घेतला. धडकेनंतर दुचाकीस्वार तेथून पसार झाला.

वसईच्या सनसिटी रस्त्यावर वॉकिंगसाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुणाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. आज सकाळी ही घटना घडली. या गंभीर अपघातात मनीष मनोहरसिंह कार्की (वय २७) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. One killed by corporator's son's two-wheeler

हा तरुण नुकताच परदेशात नोकरी करून वसईतल्या आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता. नेहमीप्रमाणे तो बुधवारी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर वॉक करीत होता. दरम्यान ८ वाजताच्या सुमारास एका दुचारीस्वारीने त्याला जोराची धडक दिली. दुचाकीस्वाराने मोठ्या प्रमाणात मद्यपान केले होते. अपघात होताच त्याने तेथून पळ काढला. MH 48 AJ 2923 असा या दुचाकीचा क्रमांक आहे. अपघातात होताच परिसरातील नागरिक जखमी तरूणाच्या मदतीला धावले. त्यांनी कार्की यास उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.One killed by corporator's son's two-wheeler

घटनास्थळी धडक दिलेल्या दुचाकी वाहनाची नंबर प्लेट मिळाली आहे. हे दुचाकी वाहन नालासोपारा पूर्वेतील एका माजी नगरसेविकेच्या मुलाचा नावाने आरटीओमध्ये रजिस्टर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास माणिकपूर पोलीस करीत आहेत.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT