राजळे-ढाकणे संघर्ष तिसऱ्या पिढीत! वडिलांसाठी धावला पुत्र

आमदार मोनिका राजळे-राष्ट्रवादीचे अॅड. प्रताप ढाकणे
आमदार मोनिका राजळे-राष्ट्रवादीचे अॅड. प्रताप ढाकणे
Published On

अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालु्क्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच ढाकणे आणि राजळे कुटुंबात घमासान सुरू आहे. पाथर्डी आणि शेवगाव मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे या आमदार आहेत. ढाकणे आणि राजळे कुटुंबात गेल्या दोन पिढ्यांपासून राजकीय संघर्ष आहे.

आ. राजळे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे अॅड. प्रताप ढाकणे यांनी मध्यंतरी टीकास्त्र डागले होते. त्यानंतर आमदार राजळे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. या आरोप-प्रत्यारोपात आता तिसऱ्या पिढीने उडी घेतली आहे. ढाकणे यांचे पुत्र ऋषिकेश यांनीही या राजकीय संघर्षात उडी घेतली आहे.Son to help Pratap Dhakne in Pathardi

प्रताप ढाकणे यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी आमदार राजळे यांना चॅलेंज दिले आहे. कासार पिंपळगाव ते तिसरामैल (वृद्धेश्‍वर कारखाना) फाटा रस्त्यावरून त्यांनी टीका केली आहे. आम्ही आमची गाडी घेतो, तुम्ही आम्हाला हा रस्ता दाखवा, असे आव्हान देतानाच (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या नावे निवडणुका जिंकता. त्यांचा पुतळा अडगळीत उभा करणार का? जॉगिंग पार्कच्या साडेचार कोटींचा हिशेब द्या, अशी टीका केदारेश्वर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी नाव न घेता आमदार मोनिका राजळे यांच्यावर केली.

ॲड. प्रताप ढाकणे यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, चंद्रकांत भापकर, योगेश रासने, देवा पवार उपस्थित होते. यावेळी आमदार राजळे यांच्यावर टीका करताना ढाकणे म्हणाले, ‘‘अंतरवाली ते बोधेगाव रस्ता माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी सुरुवातीला केला. त्यानंतर चंद्रशेखर घुलेंनी निधी दिला. आता राज्य सरकारने निधी दिला. तुमच्या निधीचा तेथे काय संबंध. शोभानगरच्या लोकांनी मतदानावर बहिष्कार घातला तेव्हा त्यांना आश्वासन दिले गेले. प्रताप ढाकणेंनी पाठपुरावा केला व तो रस्ता मंजूर केला आहे. केदारेश्वर कारखान्याचा तुम्हाला कळवळा आहे, तर मग जिल्हा बँकेचे कर्ज का मिळू दिले नाही.’’

तुम्ही गुंड पोसलेत

‘‘तुमच्या कोविड सेंटरमध्ये दहा पेक्षा जास्त रुग्ण कधी आले नाहीत. तुम्ही गुंड पोसता आणि आमच्यावर आरोप करता. ऊस तोडताना देखील राजकारण करता. शहरात पिण्याचे पाणी चार दिवसांतून एकदा मिळते. तुमचे सरकार होते. मग केंद्रातून आजपर्यंत निधी का आणला नाही. तुमच्या सोबत आम्ही येऊ, विकास दाखवाच, असा इशारा ढाकणेंनी यावेळी दिला. Son to help Pratap Dhakne in Pathardi

आमदार मोनिका राजळे यांनी भगवानगड परिसरातील पस्तीस गावांच्या लोकांना फसविले. योजना मंजूर नसताना पेढे खाल्ले आणि आता पुन्हा पाणी आणू असे म्हणता. तुम्ही भगवानगडाला फसवायला निघालात. हे बरे नाही. लोकच तुम्हाला जागा दाखवतील, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी टीका केली.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com