अकोल्यातून धक्कादायक घटना समोर.
ओबीसी बांधवाने आयुष्य संपवलं.
व्हॅट्सअॅप स्टेट्स ठेवत उचललं टोकाचं पाऊल.
अक्षय गवळी, साम टिव्ही
राज्यात सध्या आरक्षणाची लढाई पाहायला मिळत आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा बांधवांनी अलिकडेच आंदोलानाचं अस्त्र हाती घेतलं. सरकारनं मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाच्या संबंधित जीआर काढला. या जीआरला ओबीसी नेत्यांसह सामान्यांनी विरोध दर्शवला. या प्रकरणाच्या संबंधित केस देखील कोर्टात सुरू आहे. हे सर्व प्रकरण सुरू असताना अकोल्यातील ओबीसी बांधवाने आयुष्य संपवलं आहे.
राज्यात आरक्षणाची लढाई ठिकठिकाणी टोकाला जात आहे. अशातच आता अकोल्यात एका OBC बांधवाने टोकाच पाऊल उचललंय.. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, असं व्हॅट्सअप स्टेटस ठेवत या ओबीसी बांधवांने आत्महत्या केलीय. या व्यक्तीनं आयुष्य संपवल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. ओबीसी बांधवांनी शोक व्यक्त केला.
विजय बोचरे असं आत्महत्या केलेल्या ओबीसी बांधवाचे नाव आहे. विजय हे अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. ही संपूर्ण घटना आलेगाव बस थांबजवळील परिसरातून उघडकीस आली आहे. विजय बोचरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॅट्सअॅप स्टेट्स ठेवलं होतं. या व्हॅट्सअॅप स्टेट्सवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संदेश लिहिला.
नेमकं काय आहे व्हॅट्सअप स्टेटसमध्ये पाहूयात..
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य,
विषय : ओबीसी आरक्षणाबाबत
महोदय,
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेटीअरसह घेतलेला निर्णय व काढलेला जीआर यामुळे आज ओबीसी समाजात असुरक्षतेची भावना निर्माण झाली. ओबीसींचे आरक्षण संपल्यात जमा आहे. आत्ताच मुंबई उच्च न्यायालयाने ओबीसीची याचिका फेटाळली आहे. यामुळे यात आणखी भर पडली आहे. आपण तर म्हणाले होते की आमचा DNA ओबीसीचा आहे. तरी आपण ओबीसी बांधवांना वाऱ्यावर सोडल्यासारखे वाटते. तुम्हाला मुळ ओबीसींना व्यवस्थेत येऊच द्यायचे नाही. अशी माझी खात्री झालेली आहे. आमच्या शिक्षण घेत असलेल्या मुला बाळाचं काही खरं नाही. राजकीयदृष्ट्या सुद्धा मुळ ओबीसींना साध्या सरपंच पदापासूनही दूर राहावे लागेल. वरचे पदे तर आमच्यासाठी लांबच आहेत.
अशाने आमचे जिवन जगून अर्थ नाही. महोदय, तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लाऊ नका, जातीय जनगणना झाली पाहिजे.
आपलाच ओबीसी बांधव
'विजय बोचरे'.
माझे नातेवाईक समाज बांधव गावकरी बांधव,
राम राम, नमस्कार, जय भिम, सलाम... असा मजूकर व्हॅट्सअपला स्टेटस ठेवत त्यांनी आत्महत्या केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.