महाराष्ट्र

OBC Reservation: बायकोकडून ५० रुपये घेतले अन्..; ओबीसी आरक्षणावरून आणखी एका तरुणाने आयुष्य संपवलं

Youth Killed HimSelf For OBC Reservation: ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याने आणि सरकारच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत राहुल पतंगे यांनी आत्महत्या केली. “ओबीसीच्या ताटात मराठा समाजाला बसवताय हा अन्याय आहे, असं म्हणत तरुणाने आयुष्य संपवलं.

Bharat Jadhav

  • बीडमधील राहुल पतंगे यांनी ओबीसी आरक्षणावरून आत्महत्या केली.

  • आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सरकारवर अन्यायाचा आरोप केलाय.

  • या घटनेमुळे ओबीसी समाजात संताप वाढलाय.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचं म्हणत आणखी एका तरुणाने आत्महत्या केलीय. राहुल पतंगे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. ही घटना बीडमधील पेठबीड गावात घडलीय. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक सुसाईड नोट लिहिलीय. यात त्याने ओबीसी आरक्षण गेल्याचं म्हणत सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय.

काय आहे सुसाईड नोट?

ओबीसीच्या ताटात मराठा समाजाला बसवताय हा अन्याय आहे, असा उल्लेख राहुल पतंगे याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही जो ओबीसीच्या ताटात मराठा समाजाला बसवत आहात हा ओबीसींवर अन्याय आहे. तरी ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाकेंच्या मोर्चात जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हा. हाके साहेब, पंकजा मुंढे, धनंजय मुंडे,वाघमारे, भुजबळ साहेब यांनी ताकदीने लढा लढावा, मी यासाठी बलिदान देत आहे.

दरम्यान या प्रकरणी राहुल पतंगे याच्या पत्नीने पेड बीड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. राहुल ज्ञानेश्वर पतंगे हे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यापासून सारखे टेन्शनमध्ये दिसत होते. आपल्या मुलांबाळांच आता काही खरं नाही आणि नोकऱ्या पण लागणार नाहीत. ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे. आपल्याला आरक्षण आता राहिले नाही असे राहुल वारंवार म्हणत होते. ते घरात शातंशांत राहत होते.

त्यांना बरेच वेळा समजावून सांगितले होते. २४ सप्टेंबर रोजी त्यंनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पत्नी वैशाली पतंगे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. घटनेच्या दिवशी राहुल पतंगे अस्वस्थ होते. राहुल कामाला गेला नव्हते. पत्नीन वैशालीनं त्यांना घरी राहण्याचं कारण विचारलं. आपल्या ओबीसी समाजावर अन्याय झाल्याने मला काही जगू वाटत नाही, असे राहुल यांनी आपल्या पत्नीला उत्तर दिलं. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी पत्नीकडून पन्नास रुपये मागितले.

पत्नीकडून पन्नास रुपये घेतले आणि घराबाहेर गेले. घरी जेवण करण्यास त्यांच्या पत्नीनं सांगितलं. पण ५० रुपयांचे काहीतरी बाहेर खाऊन घेईन,असे म्हणून राहुल घरातून निघून गेले. त्यानंतर राहुल यांनी आपला फोन बंद केला. त्यानंतर संध्याकाळी अंदाजे साडेसात वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी खंडोबा मंदिराच्या बाजुला असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा-ओबीसी समाज घटक आमनेसामने आलेत. मराठा सामजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pranjal Khewlkar: पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांना दिलासा, जामीन देण्यामागचं खरं कारण आलं समोर, वकिलांनी नेमकं काय सांगितलं? VIDEO

Maharashtra Live News Update: - महादेवी हत्ती परत येण्याचा मार्ग सुकर,जॉईंट प्रपोजल देण्याचे न्यायमूर्तींचे आदेश

Akola : अकोल्यातील मंडळ अधिकाऱ्याचा आगाऊपणा; 200 एकर शेत जमीन पाण्याखाली, तहसीलदाराने काय सांगितलं?

शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? रामदास आठवलेंनी कवितेतून सगळंच सांगितलं|VIDEO

Mumbai Dandiya: आधी धक्का दिला नंतर घेरत जमावानं तुडवलं; गोरेगाव नेस्को दांडिया महोत्सवात तरुणाला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT