Manoj Jarange Patil Vs Laxman Hake Saam Tv
महाराष्ट्र

Maratha VS OBC Aarakshan: राज्यात आरक्षणा आंदोलनांचा भडका, आता ओबीसी आरक्षण आंदोलन पेटलं; जरांगे आणि हाके आमनेसामने

Manoj Jarange Patil VS Laxman Hake Battle: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आमरण उपोषण सुरु केलंय. मात्र हे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याची टीका मनोज जरांगे पाटलांनी केलीय..त्यावरून आता आंदोलनाचा भडका उडालाय.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी उपोषण सुरु केलंय. आमरण उपोषणामुळे हाकेंची प्रकृती ढासळली आणि राज्यात ओबीसींच्या संतापाचा भडका उडाला. त्यातच ओबीसींचं आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. तर त्याला उपोषणाला बसलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, सरकारची कोंडी झाली नाही तर त्यांनीच आंदोलन पुरस्कृत केलं आहे. तर यावर लक्ष्मण हाके म्हणाले की, सरकार पुरस्कृत आंदोलन कसं असतं माहिती नाही.

एकीकडे सगे-सोयऱ्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने 1 महिन्याची मुदत मागून मनोज जरांगेंचं उपोषण सोडवलं. मात्र दुसऱ्या बाजूला सरकारने दिलेले 57 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केलीय. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झालीय. मराठवाड्यात ओबीसी समाज आक्रमक झाला असून रास्तारोको आणि जाळपोळीच्या घटना सुरू आहेत. लक्ष्मण हाकेंनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केलंय. ते म्हणाले आहेत की, प्लीज कुणीही कायदा हातात घेऊ नये.

मराठा आणि ओबीसी आंदोलकांच्या परस्परविरोधी मागण्यांमुळे सरकारची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालीय. त्यामुळे भडकलेलं आंदोलन शमवण्यासाठी सरकार कसा मार्ग काढणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murmura Chivda Recipe: घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिवडा, चवीला होईल सर्वात भारी

Maharashtra Live News Update: खेडमध्ये शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Nagar Panchayat Elections: भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न' काय? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याआधीच गुलाल कसा उधळतो?

Jeera Rice Recipe: इंद्रायनी तांदळाचा जिरा राईस कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT