मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं शासणाने जाहीर करावं अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. दरम्यान आजपासून राज्यात ठिकठिकाणी ओबीसी संघटनांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला आहे. (Latest OBC Protest News)
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी बीडमध्ये ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराजवळ महालक्ष्मी चौकात अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
अगोदरच ओबीसीमध्ये चारशे जाती आहेत आणि आरक्षण १७ टक्के आहे. त्यामुळे मराठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर आरक्षण वाटता येणार नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. अशी मागणी समता परिषदेसह इतर ओबीसी संघटनांनी केली आहे.
सरकारने दबावाखाली येऊन ओबीसीमधून आरक्षण दिले तर ओबीसी समाज देखील आक्रमक होईल, त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल, असा इशाराही ओबीसी संघटनांनी दिला आहे.
खामगाव येथे देखील ओबीसी समाजाच्या हजारो नागरिकांणी भव्य मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार व उपविभागीय अधिकार्यांना तश्या आशयाचे निवेदन ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.
बीडमध्ये समता परिषदेसह ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात. तसेच नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांच्या साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. आज दहा ओबीसी पदाधिकारी साखळी उपोषणाला बसले आहेत. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा जिल्ह्यातही आंदोलन सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.