OBC Leaders Protest saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: संघर्ष पेटणार! ओबीसीही मुंबईत धडकणार? मनोज जरांगेंच्या उपोषणाला उपोषणाने उत्तर देणार

OBC Leaders Protest : मनोज जरांगेंसोबत लाखो मराठा बांधव मुंबईत धडकल्यानंतर आता ओबीसींनीही चलो मुंबईचा नारा दिलाय. त्यासंदर्भात छगन भुजबळांनी पत्रकार परिषदेत ओबीसी समाजाची रणनीती ठरवलीय.ती रणनीती नेमकी काय आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असून लाखो मराठा बांधव मुंबईत धडकले.

  • ओबीसी नेत्यांनी याला प्रत्युत्तर म्हणून उपोषणाची घोषणा केली.

  • छगन भुजबळांनी ओबीसी समाजासाठी रणनीती ठरवली.

मनोज जरांगेंनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.. त्यातच आता ओबीसी नेत्यांनी बैठक घेऊन एकजूट दाखवलीय. आरक्षणाला धक्का लागल्यास लाखोंच्या संख्येनं ओबीसी मुंबईत ध़डकणार असल्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय.

खरंतर मनोज जरांगेंनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दाखला देणारं हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केलीय. तर उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टातील निर्णयामुळे सरकारसमोरचा पेच वाढलाय. दरम्यान सरकार जरांगेंच्या दबावाला बळी पडण्याची शक्यता असल्याने ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ अॅक्टिव्ह झालेत. तर भुजबळांनी उपोषणाला उपोषणाने उत्तर देत ओबीसीत वाटेकरी नको, अशी थेट भूमिका भुजबळांनी घेतलीय.

मंत्री छगन भुजबळांनी आता ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण आणि मोर्चाची हाक दिल्याने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष अटळ आहे... मात्र सरकारने गावखेड्यातील सामाजिक वीण विसकटू नये, यासाठी उपाययोजना करायला हव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिव्हर कॅन्सरच्या सुरूवातीला दिसून येतं 'हे' एक लक्षण

Jio VIP Numbaer: Jio व्हीआयपी नंबर कसा मिळवावा? फॉलो करा ही खास ट्रिक

Beed Rain : गेवराई तालुक्यात ऊस पिकाचे अतोनात नुकसान; मदत वाढवून देण्याची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकसाठी बंद, हत्तूर पूल पूर्णतः पाण्याखाली गेला

Cholesterol Control Tips: गोळ्या, औषधं घ्यायची गरजच नाही! ५ उपाय करतील कोलेस्ट्रॉल कमी, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT