OBC जनगणना परिषदेतर्फे खासदार सुनील मेंढे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

OBC जनगणना परिषदेतर्फे खासदार सुनील मेंढे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

अभिजीत घोरमारे

भंडारा - जातीनिहाय जनगणना (Caste wise census) करण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) तयार नसल्याचे जाहिर केल्याने ह्या घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी ओबीसी जनगणना (OBC Janganana Parishad) परिषदेच्या वतीने खासदार सुनील मेंढे (BJP MP Sunil Mendhe) यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. ओबीसी जनगणना परिषदेचे अनेक कार्यकर्ते खासदार निवास स्थानासमोर ठिय्या आंदोलनास बसले होते. (OBC Janganana Parishad protesting in front of MP sunil mendhe's house)

हे देखील पहा -

केंद्र सरकारने संसदेच्या नुकत्याच सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात येणार नसल्याचे लोकसभेत केंद्र शासनाचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे जाहिर केले. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ओबीसी जनगणना परिषदेच्या वतीने खासदार निवास स्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

1931 ला झालेल्या जनगणनेत ओबीसी समाज 52% दाखविन्यात आला आहे. आता 90 वर्ष झाली तरी ओबीसींची जनगणना झाली नाहीं हा ओबीसींवरील अन्याय असून त्यामुळे ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळत नाही. त्यामुळे खासदार सुनील मेंढे यांनी लोकसभेत ओबीसी जनगणनेचा मुद्दा रेटुन धरून ठेवावा ह्या दृष्टीने प्रयत्न करावे व केंद्र सरकारने ओबीसी विरोधी धोरणात बदल करावा ह्या मागणीला घेऊन हे ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT