LPG गॅस सिलिंडरच्या दराचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक धक्का सर्वसामान्या नागरिकांना बसला आहे.
LPG गॅस सिलिंडरच्या दराचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
LPG गॅस सिलिंडरच्या दराचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्रीSaam Tv
Published On

नवी दिल्ली: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक धक्का सर्वसामान्या नागरिकांना बसला आहे. सरकारी तेल उत्पादक कंपण्यांनी 1 ऑगस्टपासून LPG गॅस सिंलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOC) 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 73.5 रुपयांची विक्रमी वाढ केली आहे. यानंतर भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये (Navi Delhi) गॅसची किमत वाढून 1623 रुपये झाली आहे.

14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमती जैसे थे

तेल कंपन्यांनी सामान्य माणसाने वापरलेल्या 14.2 किलो विनाअनुदानित LPG सिलिंडरच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. राजधानीमध्ये 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किमत 834.50 रुपयांवर कायम आहे. जुलै महिन्यात तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ केली होती.

LPG गॅस सिलिंडरच्या दराचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
बोरवलीमध्ये झळकल्या 'No Kissing Zone'च्या पाट्या; पाहा VIDEO

देशात अनुदानाशिवाय 14.2 किलो सिलिंडरची किंमत

विनाअनुदानित 14.2 किलो सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 834.50 रुपये आहे तर, कोलकात्यात 861 रुपये, मुंबईत 834.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 850.50 रुपये प्रति सिलिंडर आहे.

19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवी किंमत

सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रचंड मोठी वाढ केली आहे. सर्वाधिक वाढ चेन्नईमध्ये 73.50 रुपये प्रति सिलिंडर झाली तर दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 73 रुपयांनी वाढून 1623 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 72.50 रुपयांनी वाढून 1629 रुपये झाली आहे तर मुंबईत 72.50 रुपयांनी वाढून 1579.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 73.50 रुपयांनी 1761 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com