OBC and EWS Girls Education Saam TV
महाराष्ट्र

OBC and EWS Girls Education: OBC आणि EWS मधील मुलींसाठी आनंदाची बातमी; शिक्षणाची संपूर्ण फी सरकार भरणार

Cabinet Sub Committee Meeting: मराठा उपसमितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. ओबीसी आणि इडब्ल्यूएसमधील मुलींची संपूर्ण फी सरकार भरणार

Ruchika Jadhav

संजय गडदे

OBC and EWS Girls Education Fees:

महाराष्ट्र सरकार राज्यातील शेड्युल कास्टमधील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी भरत आहे. अशातच आता ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील मुलींची सर्व अभ्यासक्रमांची संपूर्ण फी (Education Fees) सरकार भरणार असल्याचा महत्त्वूर्ण ठराव आरक्षण आणि तर सुविधांबाबत झालेल्या सरकारच्या मराठा उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. आठ लाखांपेक्षा कमी वर्षीक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ घेता येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षण उप समितीच्या झालेल्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला असून लवकरच तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यातील ओबीसी आणि EWS इडब्ल्यूएसमधील लाखो मुलींना याचा लाभ होणार आहे सध्या सरकार ओबीसीतील विद्यार्थ्यांची निम्मी फी भरते.

शिवाय मागील तीन वर्षांपासून शुल्क प्रतिपूर्ती परतफेड करण्याबाबत येत्या अधिवेशनात प्रस्ताव मंजूर केला जाणार असल्याची माहिती मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मराठवाड्यातील एका मुलीकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर हे प्रकरण पुढे आले. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत ओबीसी आणि ई डब्ल्यू एस प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमांच्या संपूर्ण फीबाबत निर्णय घेण्यास पावले उचलण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानंतर काल झालेल्या उपसमितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हा ठराव मंत्रिमंडळात मंजुरीकडे पाठवला नंतर 642 कोर्सेसाठी १ हजार कोटीची नव्याने तर्तूद करावी लागणार असल्याचे देखील समजले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सत्तेची दोरी ओबीसींच्या हाती; मुस्लीम मतदार ठरणार निर्णायक

Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे

Success Story: अनाथाश्रमात वाढला, पैशासाठी वेटर-डिलिव्हरी बॉय झाला, पण जिद्द सोडली नाही; आज IAS ऑफिसर, वाचा संघर्षाची गाथा!

viral video : धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Election : महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? प्रचारसभेत अमित शाहांचे संकेत

SCROLL FOR NEXT