Beed OBC Protest Saam tv
महाराष्ट्र

Beed OBC Protest : ओबीसी आंदोलन तापलं, बीडमध्ये आंदोलकांनी महामार्ग अडवला; टायरही जाळले, Video बघा

OBC Protest in Beed : बीडमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापलं आहे. बीडमध्ये ओबीसीच्या मुद्यावरून आंदोलकांनी महामार्ग अडवला. तसेच टायरही जाळले.

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये ओबीसी आंदोलन तापलं आहे. विविध मागण्या आणि आरक्षणाच्या मुद्दयावरून ओबीसी बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी बांधवांनी बीडच्या तलवाडा फाटा परिसरात महामार्ग अडवला. तसेच या महामार्गावर रस्ताही अडवला. ओबीसी बांधवांच्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या तलवाडा फाटा परिसरात ओबीसी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गावर टायर पेटवत धुळे-सोलापूर महामार्ग अडवण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, या मागणीसाठी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्गावर टायर पेटवत रास्ता आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं.

आंदोलकांनी रस्ता अडवल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, वडीगोद्री प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने गाड्या पाहायला मिळत आहे. लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी राज्यभरातून लोक उपोषणस्थळी येत आहेत.

जालन्यातही ओबीसी समाज आक्रमक

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून शेकडो चारचाकी वाहनांचा ताफा वडीगोद्रित दाखल झाला आहे. उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणी नवनाथ वाघमारे यांची तब्येत खालवल्याने ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे.

हाके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. त्यातच त्यांची प्रकृती खालवली आहे. त्यामुळे राज्यभरातून ओबीसी बांधव वडीगोद्रित दाखल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही राजकीय नेतेही लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी येत आहेत. तसेच लक्ष्मण हाके यांच्याकडून आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्यावरही गंभीर आरोप केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

SCROLL FOR NEXT