मराठा समजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange PAtil) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) दंड थोपटले आहे. मागण्या मान्य केल्या नाही तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा इशारा त्यांना दिला. विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यावर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषणाला बसलेले आमदार लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील आणि आरक्षणाचा संबंध काय? तसंच, जरांगेंना ओबीसी आरक्षण संपवायचे आहे का?, असा संतप्त सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
लक्ष्मण हाके यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'हे ऐवढे सगळे निवडून आल्यावर ओबीसींचे आरक्षण संपवणार आहेत का? त्यांना आरक्षण संपवायचे आहे. मी संविधानातील ओबीसींच्या हक्क आणि अधिकाराबद्दल बोलत आहे. शासन जर ओबीसींचे हक्क आणि अधिकाराचे संरक्षण करण्यामध्ये यशस्वी झाले तर ठिक आहे. तर कशाला राजकारण करायचे. मी मेंढपाळाचा मुलगा आहे. तर मी कुठून मॅन, मनी आमि मसल आणणार. निवडणूक जिंकणारी सफाईदार जमात आहे या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे माझ्या निवडणुका म्हणण्यापेक्षा मी हक्क आणि संरक्षणासाठी लढत आहे. त्यामुळे जरांगेचा निवडणुकीची पहिल्यापासून प्रोग्राम होता. लोकसभेत त्यांनी दाखवले हे महाराष्ट्राला माहिती आहे.'
लक्ष्मण हाके यांनी आरक्षणावरून थेट जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'आरक्षण आणि जरांगे यांचा संबंध काय आहे. त्यांना काय माहिती आरक्षण पॉलिसी काय आहे. एनटी काय आहे, एससी- एसटी काय आहेत हे त्यांना माहिती आहे का? त्या माणसाचा काय संबंध आहे. झुंडशाही करणे आणि ग्रामीण भागातील ओबीसींना भयभीत करणे, त्यांच्यामध्ये धास्ती निर्माण करणे, बीड सारख्या शहरात टार्गेट करून घरं जाळणे हा दहशतवाद आहे. हा कायदा मोडणारा माणूस आहे कायदा पाळणारा माणूस नाही.', अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे असा आरोप जरांगे-पाटील यांनी केला आहे. यावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, 'कसं असतं सरकार पुरस्कृत या प्रश्नाचे उत्तर त्यांना विचारा. कुठलं सरकार असे करेल आणि करत असेल तर कसं करेल हे देखील त्यांनाच विचारा.'
तसंच, सरकारने ओबीसी आंदोलनाची दखल घेतली असून येत्या दोन दिवसांत शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेणार असल्याचे भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, 'सुबुद्धी देवो आणि ते लवकर येवो. दोन दिवस नाही आठ दिवसांने आले तरी चालेल. मी मेलो तरी मला काही हरकत नाही. मी काही मोठा माणूस नाही त्यामुळे यांना काही फरक पडत नाही.', अशी टीका लक्ष्मण हाके यांनी सरकारवर केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.