Nashik Shocking News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Shocking : विद्येच्या मंदिरातही मुली असुरक्षित; नाशकात प्राचार्याने विद्यार्थिनीसोबत केला लाजीरवाणा प्रकार, परिसरात खळबळ

Crime News Nashik: नाशिकमध्ये प्राचार्याने विद्यार्थिनीसोबत लाजीरवाणा प्रकार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Vishal Gangurde

तबरेझ शेख, साम टीव्ही

नाशिक : प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर संबंधित नर्सिंग कॉलेजच्या इतर विद्यार्थिनीसह पालकांनी घडलेल्या घटनेबाबत कॉलेज प्रशासनाकडे चौकशीसाठी गेले. त्यानंतर त्यांनी असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे उत्तर दिले. यामुळे विद्यार्थिनींनी संतप्त होत संपूर्ण व्यवस्थापकीय मंडळ बदलण्याची मागणी केली. त्यामुळे कॉलेज आवारात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

नाशिकच्या द्वारका भागातील एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा कॉलेजच्या प्राचार्याकडून विनयभंग करण्यात आला होता. पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून शुक्रवार भद्रकाली पोलिस ठाण्यात प्राचार्य प्रवीण रमेश घोलप (वय ४०) याच्यावर चार गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनींनी आणि पालकांनी कॉलेजच्या आवारात जमा झाले. कॉलेजच्या व्यवस्थापनाशी भेट घेत घटनेची चौकशी केली. असा कुठल्याही प्रकार झाला नसून बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या प्रसारित होत असल्याचे त्यांनी पालकांना उत्तर दिले.

विद्यार्थिनींनी संतप्त होत कॉलेज आवारात गोंधळ घातला. पालकांनीही व्यवस्थापकीय कामकाजाचा निषेध व्यक्त केला. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी कॉलेज प्रशासनाने संपूर्ण व्यवस्थापकीय मंडळ बदलण्याची मागणी केली. संशयित प्राचार्यांना पुन्हा नोकरीत घेणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने दिले. विद्यार्थिनी आणि पालक मात्र संपूर्ण व्यवस्थापकीय मंडळ बदलण्याच्या मागणीवर ठाम राहिले.

काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत. त्यांची समजूत काढली. त्यानंतर पालक आणि विद्यार्थिनी कॉलेजमधून काढता पाय घेतला. घडलेल्या घटनेबाबत न्याय मिळावा आणि व्यवस्थापकीय मंडळ बदलण्याची मागणी तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. यासाठी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाच्या कुलगुरूंची भेट घेणाऱ्या पालक आणि विद्यार्थिनींकडून सांगण्यात आले. सोमवारी कॉलेज बंद ठेवण्याची नामुष्की यामुळे ओढवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT