Prakash Ambedkar Saam Tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: 'आता कुणाचंही वर्चस्व स्वीकारणार नाही, बरोबरीने वागा', प्रकाश आंबेडकरांचा रोख कोणाकडे?

Prakash Ambedkar News: ''आता कुणीही कुणाचं वर्चस्व स्वीकारायला तयार नाही. बरोबरीने वागा. हातांच्या बाहेर परिस्थिती गेली तर, ठोकल्या शिवाय राहणार नाही'', असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास, वर्धा

Prakash Ambedkar News:

''आता कुणीही कुणाचं वर्चस्व स्वीकारायला तयार नाही. बरोबरीने वागा. हातांच्या बाहेर परिस्थिती गेली तर, ठोकल्या शिवाय राहणार नाही'', असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. वर्धा येथे ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, ''आज राजकारणातल पाणी पूर्ण गढूळ झालं आहे. यामुळे त्यात नवीन पाणी टाकून फायदा नाहीय. यामुळे पाणीच बदलावं लागेल. यावेळी जाती, नातेवाईक यांना प्राधान्य दिलं तर, दिल्लीत दिसणारी आराजकता गल्लीत पोहचेल. राजकारण्यांचा उन्माद वाढला आहे.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रकाश आंबेडकर म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बोलतात की, आंदोलन कराल तर कारवाई होईल. आंदोलन ही समस्या मांडण्याचं माध्यम आहे. ते सुद्धा तुम्ही बाटलीत बंद करण्याचं ठेवलं आणि उद्या ती बाटली फुटली तर सांभाळणार कोण?   (Latest Marathi News)

ते म्हणाले, मोदींच्या दहा वर्षाच्या कालावधीत जे कामाला होते, त्यापैकी पाच टक्के बेरोजगार झाले. मोदींनी बेरोजगारी कमी केली नाहीय तर, पाच टक्क्यांनी वाढवली आहे. याकरिता पुन्हा सत्तेत बसवायचं का यांना? आंबेडकर म्हणाले, कापूस हा देशात सर्वात मोठं उत्पादन होणारं पीक आहे. त्याला वाचवण ही सरकारची जबाबदारी आहे.

प्रकाश आंबेडकर याआधी म्हणाले की, ''मागील दहा वर्षात मोठे उद्योजक आणि राजकीय नेत्यांवर भाजपने दीड लाख लोकांवर धाडी टाकल्या. मागील दहा वर्षात मोदींनी दीड लाखावर लोकांवर धाड घातली. पण न्यायालयात किती लोक दोषी आहेत हे सांगितलं? कोणी दोषी आहे म्हणून या धाडी टाकण्यात आल्या नव्हत्या, तर ते (विरोधी पक्ष नेते) तुमचं ऐकत नाही म्हणून धाडी टाकल्या. ''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात विजयासाठी महायुतीची रणनीती ठरली; मित्र पक्षाला एकत्र घेत बांधली समन्वयाची मोट

IPL 2025 Auction: कोण मालामाल होणार! पंत, राहुल ते अय्यर; भारताच्या 'या' खेळाडूंची बेस प्राईज सर्वाधिक

Maharashtra News Live Updates : भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांना अश्रू अनावर

Nevasa Vidhan Sabha : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची भाजपमधून हकालपट्टी; बंडखोरी करत भरलेला अर्ज कायम ठेवल्याने कारवाई

Mobile In Marathi: मोबाईलला मराठीत काय म्हणतात?

SCROLL FOR NEXT