डीजे वाजवण पडलं महागात; 12 पोलिसांची एक वर्षासाठी वेतनवाढ बंद ! अरुण जोशी
महाराष्ट्र

डीजे वाजवण पडलं महागात; 12 पोलिसांची एक वर्षासाठी वेतनवाढ बंद !

पोलिस ठाण्याच्या आवारात गणेश विसर्जनादरम्यान डीजे वाजवल्याचा एक व्हिडिओ २२ सप्टेंबरला व्हायरल झाला होता.

अरुण जोशी

अमरावती : तळेगाव दशासर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी गणेश विसर्जनासाठी Ganesha Visarjan डीजे वाजवला होता. ही बाब समोर येताच तडकाफडकी पोलिस अधीक्षकांनी ठाणेदारांची नियंत्रण कक्षात बदली केली होती. तसेच प्रकरणाची सखोल चौकशी एसडीपीओंकडे सोपवली होती. दरम्यान या चौकशीत ठाण्यातील १२ पोलिसांचा डीजे प्रकरणात सहभाग आढळल्यामुळे ठाणेदारांसह १२ पोलिसांना एक वर्ष वेतनवाढ रोखण्याबाबत नोटीस बजावल्या आहेत. मात्र ठाणेदार आकरे डीजे वाजला त्यादिवशी ठाण्यात हजर नसून कार्यालयीन कामानिमित्त अमरावतीत होते. त्यामुळे त्यांना तळेगावला ठाणेदार म्हणून परत पाठवले आहे. (Notices have been issued to 12 policemen to stop the pay hike for one year)

कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, कुठेही विसर्जन मिरवणूक काढू नये, ढोल ताशे किंवा डीजे वाजवू नये, अशा शासनाच्या सूचना होत्या. मात्र असे असतानाही तळेगाव दशासर पोलिसांनीच ठाण्याच्या Talegaon Dashasar Police Thane आवारात गणेश विसर्जनादरम्यान डीजे DJ वाजवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर Video Viral On Social Media २२ सप्टेंबरला व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओची दखल घेत तळेगावचे ठाणेदार अजय आकरे यांना त्याच दिवशी नियंत्रण कक्षात बदली दिली होती. तसेच या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत, याबाबत एसडीपीओ जाधव यांच्याकडे चौकशी सोपवली होती.

चांदूर रेल्वे SDPO जाधव यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सोपवला होता. या अहवालाच्या आधारे १२ जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ठाणेदारासह १२ जणांना एक वर्ष वेतनवाढ रोखण्याबाबत पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी नोटीस दिल्या आहेत. ठाणेदार प्रत्यक्ष हजर नसल्यामुळे त्यांचा दोष नाही, मात्र ठाणे प्रमुख म्हणून त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.या नोटीस बजावल्या मुळे पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT