निवडणुकीच्या तोंडावर अमरावती जिल्हा बँकेच्या संचालकांना ED ची नोटीस; राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ अरुण जोशी
महाराष्ट्र

निवडणुकीच्या तोंडावर अमरावती जिल्हा बँकेच्या संचालकांना ED ची नोटीस; राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 750 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत साडेतीन कोटी रुपयांच्या दलालीचा घोळ झाल्याचा आरोप आहे.

अरुण जोशी

अमरावती - अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणामध्ये ED कडून बँकेच्या दोन संचालकांना (Directors) समन्स बजाविण्यात आली आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष (Former Chairman) अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख तसेच मावळत्या अध्यक्षा प्रा. उत्तरा जगताप (Uttara Jagtap) यांना समन्स (Notice) बजाविल्यामुळे सहकार आणि राजकीय क्षेत्रातमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाची बाब अशी की सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांच (Bank Elections) बिगुल वाजलं आहे. आता या मुद्यावरून विरोधी पॅनेल आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. (Notice of ED to the Director of Amravati District Bank)

हे देखील पहा-

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 750 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत साडेतीन कोटी रुपयांच्या दलालीचा घोळ झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह 11 अधिकारी व कर्मचाऱ्यां विरोधात कोतवाली ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच सध्या या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात मागील आठवड्यात बँकेचे CEO श्री. राठोडांना ED कडून समन्स देण्यात आली होती. तसेच त्यांनी मुंबई येथील ED च्या कार्यालयात कागदपत्र सादर केले होते. त्यानंतर आता बँकेच्या दोन मोठ्या संचालकांना सुद्धा ED कडून उपस्थित राहण्याचा समन्स पाठविण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

प्रा. उत्तरा जगताप यांना 20 सप्टेंबर तर बबलू देशमुख यांना 23 सप्टेंबरला मुंबईंमधील ईडी कार्यालामध्ये हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असला तरी आता थेट ईडीनेच त्यामध्ये उडी मारल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे यात काही शंका नाही दरम्यान, याप्रकरणी बबलू देशमुख तसेच उत्तरा जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT