महाविकास आघाडी पासून धोका, मात्र आघाडीला धोका नाही; छगन भुजबळांच सूचक वक्तव्य

राजकारणात सगळे आपाआपली मैत्री जपत असतात.
महाविकास आघाडी पासून धोका, मात्र आघाडीला धोका नाही; छगन भुजबळांच सूचक वक्तव्य
महाविकास आघाडी पासून धोका, मात्र आघाडीला धोका नाही; छगन भुजबळांच सूचक वक्तव्य SaamTV

रश्मी पुराणीक

मुंबई : आज मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरें (CM Uddhav Thackeray) यांनी 'आजी-माजी एकत्र आले तर भावी सहकारी होऊ शकतो.' अशा आशयाच वक्तव्यं केले होते या विधानामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरती बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राजकारणात सगळे आपाआपली मैत्री जपत असतात, तसेच एकत्र येवू शकतो याचा अर्थ दानवे शिवसेनेत येणार असले तर मला माहित नाही अशा प्रकारच उत्तर त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं. (Chhagan Bhujbal's suggestive statement)

हे देखील पहा-

'विरोधी पक्ष दुश्मन नसतात मित्र असतात कदाचित दानवेंना (Ravsaheb Danave) शिवसेनेत (Shivsena) यायचं अस असेल तर मला काही तस वाटत नाही. तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादीचा (Congres NCP) काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही, मात्र मागच्या 5 वर्षात शिवसेनेला भाजपने (BJP) कशी वागणूक दिली. हे सेनेला माहीत आहे. असं म्हणत त्यांनी शिनसेनेलाही भूतकाळाची आठवण करुन दिली आहे. सेना भाजप सरकार असताना केंद्रात इतर पक्षांना दिलेली मंत्रिपदं आणि शिवसेनेची केलेली अवहेलना सर्वांना माहित आहे असही भूजबळ म्हणाले.

आत्ताच्या सरकार मध्ये मुख्यमंत्री त्रस्त आहेत, असं मला अजिबात वाटत नाही. तसेच 'महाविकास आघाडीपासून धोका असले, पण महाविकास आघडीला धोका नाही' असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी पत्रकार परिषदेत (Press Conference) केलं आहे

दिल्लीत कोणालाही मंत्री करतात

चंद्रकांत पाटलांच्या (Chandrkant Patil) 'मला माजी मंत्री म्हणू नका' या वक्तव्यावरुन आणि त्यांच्या राज्यपाल पदांच्या चर्चेवरुण ते म्हणाले दिल्लीत कोणालाही मंत्री करतात असं म्हणत त्यांनी पाटलांना टोला लगवाला आहे.

महाविकास आघाडी पासून धोका, मात्र आघाडीला धोका नाही; छगन भुजबळांच सूचक वक्तव्य
नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण; नीलम गोऱ्हेंचा पंतप्रधानांना 'हा' सल्ला!

ओबीसी आरक्षण अध्यादेश

ओबीसी (OBC) आरक्षणावरती (Reservation) बोलताना भूजबळ म्हणाले निवडणूक आयोग स्वायत्त आहे महाराष्ट्रात त्यांच ते स्वतंत्रपणे काम करत असतात. ओबीसी आरक्षणाचा अध्यादेशाचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर झाला आहे. अध्यादेश प्रारूप करायचं काम देखील झालं आहे आता यावरती राज्यपाल निर्णय घेतील, ओबीसी आरक्षणासंदर्भातील अध्यादेश आज राज्यापालांना सरकारतर्फे देण्यात येणार आहे. तो मंजूर झाल्यावर तो अध्यादेश निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल मग ते काय करतात ते बघू अशी माहिती भूजबळांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com