नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण; नीलम गोऱ्हेंचा पंतप्रधानांना 'हा' सल्ला!

केंद्राने आणि राज्याने एकत्रित काम करावे.
नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण; नीलम गोऱ्हेंचा पंतप्रधानांना 'हा' सल्ला!
नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण; नीलम गोऱ्हेंचा पंतप्रधानांना 'हा' सल्ला!SaamTV
Published On

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छ्या, पण पंतप्रधान मोदी यांनी समन्यायी पद्धतीने सर्व राज्याशी वागावे हि त्यांच्या वाढदिवसाला आम्ही अपेक्षा वक्त करतोय, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज केलं आहे. (Happy Birthday to PM Narendra Modi from Neelam Gorhen)

हे देखील पहा-

आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा वाढदिवस (Birthday) असल्याकारणाने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभच्छा त्यांना येत आहेत अशाच शुभेच्छा शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हें यांनी देखील दिल्या मात्र त्यांनी यावेळी 'पण' या शब्दांचा वापर करत मोदींनी सर्व राज्यांशी समन्यायी पध्दतीने वागावे असा सल्ला दिला आहे. तसेच महिला सुरक्षा संबधी केंद्राने आणि राज्याने एकत्रित काम करावे. केंद्राने विधवा महिलांच्या सबलीकरणासाठी (Women Empowerment) योजना आणावी जीएसटी GST परतावा आमच्या हक्काचा आहे. आम्ही आमच्या हक्काचं मागत आहोत आणि तो ते दितील हिच अपेक्षा वाढदिवसदिनी नरेंद्र मोदींकडून ठेवत असल्याचही त्या म्हणाल्या.

नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण; नीलम गोऱ्हेंचा पंतप्रधानांना 'हा' सल्ला!
मुख्यमंत्र्यांनी दानवेंचा केला ''माझे भावी सहकारी'' असा उल्लेख...

प्रबोधनकार तैलचित्र महाराष्ट्र सदनात लागावे

प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांची जयंती आज महाराष्ट्र सदन मध्ये साजरी केली. भविष्यामध्ये त्यांचा एक तैलचित्र महाराष्ट्र सदनात लागावे अशी मागणी केली आपण केली असल्याचही त्या यावेळी म्हणाल्या तसेच ओम बिर्ला यांच्या सोबत बैठक झाली असून त्यांना महिला सुरक्षा बाबतीत एक वेगळे सत्र घेण्याची मागणी केली आहे. मात्र राष्ट्रीय महिला आयोग हे राजकीय केंद्र झाले आहे. हाथरस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची भूमिका संशयास्पद होती असही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com