Notebandi Effect On Shirdi Temple
Notebandi Effect On Shirdi Temple saam tv
महाराष्ट्र

Notebandi Effect On Shirdi Temple: नोटबंदीचा साई संस्थानावर परिणाम नाही! दानात 2000 रुपयांच्या नोटांचं प्रमाण अत्यल्प

Chandrakant Jagtap

>> सचिन बनसोडे, साम टीव्ही

Notebandi Effect On Shri Saibaba Sansthan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी आपली सर्वोच्च मूल्य असलेली 2,000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु देशातील सर्वात मोठ्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेले शिर्डी साई बाबा संस्थानावर या नोटबंदीचा फारसा परिणाम झाला नाही.

देशभरातून दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत येत असतात. हे भाविक साईचरणी 10 रुपयांपासून ते लाखो रुपयांचे दान अर्पण करतात. साई संस्थान आलेल्या दानाची मोजदाद आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी करते आणि दानात आलेली रक्कम तात्काळ बँकेत जमा केली जाते. त्यामुळे आता २ हजार रुपयांच्या नोटांसंदर्भात झालेल्या निर्णयामुळे साईबाबा संस्थानवर कुठलाही परिणाम होणार नाही.

खरंतर 2 हजार रुपयांच्या नोटा दानात येण्याचं प्रमाण मागील काही महिन्यांपासून अत्यल्प होतं. तसेच मागील नोटबंदीनंतर हजार आणि पाचशेच्या नोटा मोठ्या प्रमाणात दानात उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे आता आरबीआयने घेतलेल्या निर्णयानंतर 2 हजारांच्या नोटाचे दान आगामी काळात वाढणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest Political News)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी आपली सर्वोच्च मूल्य असलेली 2,000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. परंतु या नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहतील असे देखील आरबीआयने म्हटले आहे. सध्याच्या 2,000 रुपयांच्या नोटा नागरिक 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा किंवा बदलू शकतात. परंतु एकावेळी फक्त 20,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मर्यादा आरबीआयने घालून दिली आहे. सेंट्रल बँकेने लोकांना 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बँकांना 2,000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

SCROLL FOR NEXT