RBI withdraws Rs 2000 notes from circulation : दोन हजार रुपयांच्या नोटा सरकारने किती छापल्या, त्या बँकेत किती आहेत आणि एकूण व्यवहारात किती आहेत याचा हिशोब सरकारने द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
जयंत पाटील म्हणाले, दोन हजार रुपयांच्या नोटा मला नाही वाटत कोणाकडे असतील. कारण त्या बाजारातून नाहीशा झाल्या आहेत. नोटबंदी झाली होती तेव्हा काळा पैसा बाहेर आणण्यासाठी नोटबंदी केल्याचं सरकारने सांगितलं होतं. पण तसं होताना कुठं दिसलं नाही.
याउलट दोन हजार रुपयांची नोट काढून मोठी रक्कम त्यांना साठवता आली.दोन हजार रुपयांच्या नोटा काढण्यात आल्या त्यावेळी पाकिस्तानच्या सीमेवरून काही आतंगवाद्यांकडे देखील दोन हजार रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या.
'सरकारने आधी नोटांचा हिशोब द्यावा'
बँकेबाहेर लाईन लावून शेकडो लोकांचे जीव गेले, देशाचा विकासदर दोन टक्क्यांनी घसरला. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा ज्या याच सरकारने काढल्या. त्या संदर्भात असे निर्णय घेतल्याने काय फायदा होणार आहे मला माहित नाही. पण दोन हजार रुपयांच्या नोटा सरकारने किती छापल्या, त्या बँकेत किती आहेत आणि एकूण व्यवहारात किती आहेत याचा हिशोब सरकारने द्यावा. म्हणजे या नोटा किती परत येतील याचा अंदाज आपल्याला येईल असे जयंत पाटील म्हणाले. (Breaking News)
ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार रुपयांच्या नोटा काही वर्षांपूर्वीच इशू करणे बँकांनी बंद केले आहे. त्यामुळे अशा घोषणा करून फार मोठे काही साध्य होईल मला असे काही वाटत नाही. दोन हजार रुपयांच्या नोटांनी काळे धन साठवण्याची जी व्यवस्था इथल्या श्रीमंत वर्गासाठी केली होती ती व्यवस्था आता कमी होईल. पण सरकारने आधी नोटांचा हिशोब द्यावा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. (Latest Political News)
'अतृप्त आत्मे शांत करावे'
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करावा. कारण अशांत आत्मे आसपास राहणे बरे नाही. त्यामुळे त्यांना लवकरच तृप्त केले पाहिजे. आता वर्ष राहिलंय की विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयापर्यंत सरकार राहिल हे काळ ठरवेल. या सरकारमध्ये पालिका निवडणूक घेण्यासाठी धाडसच नाही, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.