Shiv Sena Sambhaji Brigade Meeting: सर्वोच्च न्यायाल्याने राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना चांगलीच सक्रिय झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहे.
एकीकडे खासदार संजय राऊत राज्यभरात दौरे करत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रणनीती ठरवत आहेत. शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेना-संभाजी ब्रिगेड यांच्या समन्वय समितीची बैठक पार पडली या बैठकीत राज्यभरात 'संयुक्त मिळावे' घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही शहरात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येऊन राज्यभरात जाती आणि धार्मिक वाद मिटवण्यासाठी सामाजिक प्रबोधन करणार आहे. ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह, विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीसाठीच्या विषयावर देखील चर्चा झाली. (Breaking News)
यात प्रामुख्याने मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना-संभाजी ब्रिगेड पदाधिकारी संयुक्त मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी होणारे प्रयत्न हाणून पाडण्यासाठीची रणनीती ठरवण्यात आली. तसेच या बैठकीत शिवसेनेची पुढील राजकीय दिशा ह्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. (Latest Political News)
उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठकीत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॕड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय सुभाष देसाई, आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.