no water supply in nanded for 4 days Saam Digital
महाराष्ट्र

Nanded Water Cut: नांदेडकरांनाे पाणी जपून वापरा! चार दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण

Nanded Latest Marathi News : नांदेड शहरातील नागरिकांनी तांत्रिक बिघडाची नोंद घेऊन नांदेड महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने नांदेडकरांना केले आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded :

नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी येथील पंप हाऊसमधील विद्युत मोटारीत तांत्रिक बिघाड झाला आहे. परिणामी विष्णुपुरी धरणातून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दरम्यान पुढील चार दिवस नांदेड शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे. (Maharashtra News)

नांदेड शहरातील उत्तर भागाचा तसेच देगलूरनाका, वजिराबाद आणि खडकपुरा भागात पुढील चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नांदेडकरांनी जपून पाण्याचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नांदेड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. सर्व यंत्रणा दुरुस्तीच्या कामाला लागल्या आहेत. परंतु हा तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी जवळपास तीन ते चार दिवसाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे नांदेडकरांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन गिरीष कदम (अतिरिक्त आयुक्त महापालिका नांदेड) यांनी केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; एशियन गेम्सच्या फायनलमध्ये रंगणार महामुकाबला, जाणून घ्या कुठे पाहता येणार सामना?

Maharashtra News Live Update : शरद पवार यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस

Bank FD : बँकेत 10 लाखांची FD आहे? बँक बुडाली तर हातात किती पैसे येणार? जाणून घ्या नियम

Morning Walk Benefits: मॉर्निंग वॉक न चुकता करताय? हे 6 सॉलिड फायदे माहिती असायलाच हवेत

Ambulence App : महाराष्ट्रात आता कॅबसारखी बुक करता येणार रुग्णवाहिका, सरकार लवकरच लाँच करणार अॅप

SCROLL FOR NEXT