Erai River Water Polluted, chandrapur water supply, chandrapur saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Water Supply News : चंद्रपूरचा पाणीपुरवठा बंद, नागरिक त्रस्त

Erai River Water Polluted : इरई नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने महापालिकेने पुरवठा बंद केला.

संजय तुमराम

Chandrapur News : चंद्रपूर शहराची जलवाहिनी इरई नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडण्यात आल्याने चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाची भीषणता पुन्हा एकदा उघड झाली आहे. (Maharashtra News)

गेल्या 2 दिवसांपासून इरई नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी येत असल्याने चंद्रपूर महापालिकेने दाताळा येथील इंटेक वेल बंद केली. त्यामुळे चंद्रपूर शहरातील 40 टक्के भागाचा पाणीपुरवठा बुधवारपासून बंद आहे. या दूषित पाण्यामुळे इरई नदीचे पाणी अतिशय प्रदूषित (Erai River Water Polluted) झाल्याने ते स्वच्छ करणे शक्य नाही. यामुळे पाणीपुरवठा बंद केल्याची माहिती मनपा आयुक्तांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

दुसरीकडे इरईमध्ये सोडण्यात आलेले प्रदूषित पाणी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनने सोडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केला आहे. नदीमध्ये ज्यांनी हे दूषित पाणी सोडले त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली जात आहे.

बेले यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज (गुरुवार) घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे. याबाबत उमाशंकर बादुले (प्रदूषण नियंत्रण अधिकारी, चंद्रपूर) म्हणाले पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT