Nandurbar Baradhara Waterfall: पर्यटकांनाे ! बाराधारा धबधब्यावर येऊ नका, ग्रामस्थांचे आवाहन; जाणून घ्या बंदीचे कारण

वर्षा पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांचा बंदीच्या निर्णयामुळे हिरमाेड हाेत आहे.
ban on tourists at nandurbar baradhara waterfall
ban on tourists at nandurbar baradhara waterfallsaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचा दुर्गम भागात असलेल्या बिलगाव येथील उदय नदीवर प्रसिद्ध असलेल्या बाराधारा धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या परिसरात दुर्घटना वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (Maharashtra News)

ban on tourists at nandurbar baradhara waterfall
Saam Impact: 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर प्रशासन झालं जागं, चांदशैली घाटातील दरड प्रवण क्षेत्रात बांधल्या जाणार संरक्षण भिंती

सातपुड्याचा नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारा उदय नदीवरील 12 मुखी धबधबा हा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. उदय नदीच्या प्रवाहा धारांच्या स्वरूपात प्रवाहित झाला आहे. नदीपात्रात पडणाऱ्या पाण्याचा प्रवाहामुळे धबधब्यांजवळ पाण्याचा अंदाज न आल्याने येथे दुर्घटना घडल्याचा अनुभव ग्रामस्थांच्या गाठीशी आहे.

ban on tourists at nandurbar baradhara waterfall
Ravikant Tupkar vs Raju Shetti : अखेर राजू शेट्टींनी रविकांत तुपकरांना सुनावलं

गत तीन वर्षात पाच ते सहा पर्यटकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी या धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घातली आहे.

एकीकडे वर्षा पर्यटनासाठी सातपुड्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असली तरी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये असलेल्या धबधब्यांवर सुरक्षा सुविधांअभावी पर्यटकांना बंदी घालावी लागली आहे. जोपर्यंत नदीपात्रात आणि नदीकाठावर सुरक्षा उपायोजना केल्या जात नाही तोपर्यंत ही बंदी राहणार असल्याचा ग्रामस्थांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com