mahanand Dairy employees saan Tv
महाराष्ट्र

Mahanand Dairy : महानंद डेअरीच्या कर्मचाऱ्यांचा ७ महिन्याचा पगार रखडला; डेअरीच्या प्रवेशद्वारावर कर्मचा-यांची निदर्शने

Mahanand Dairy : महानंद डेअरीने राज्य सरकारच्या भरोशावर कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती जाहीर केलीय. त्यानुसार ५३० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यासाठी २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र सरकारने अद्यापही यासाठी रक्कम उपलब्ध करून दिले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(संजय गडदे, मुंबई)

Mahanand Dairy Employees Protest :

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने महानंद डेअरीला वाऱ्यावर सोडलंय. महानंदमध्ये काम करत असलेल्या जवळपास ९०० कर्मचाऱ्यांना ७ महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे हे कर्मचारी सध्या तणावाखाली आहेत. महानंदा डेअरी एनडीडीबीकडे देण्याचा प्रस्ताव मंजूर होऊ नये अद्याप डेअरीचे व्यवस्थापन स्थानांतर झाले नाही. शिवाय महानंद डेअरीने राज्य सरकारच्या भरोशावर कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती जाहीर केलीय.(Latest News)

त्यानुसार ५३० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यासाठी २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र सरकारने अद्यापही यासाठी रक्कम उपलब्ध करून दिले नाही. यामुळे डेअरी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आज कर्मचाऱ्यांकडून महानंदा डेअरीच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांकडून डेअरी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली जर मागण्या मान्य झाल्या नाही तर लवकरच आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागे एक आठवड्यापूर्वी प्रिया मिटके यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. आज परत एकदा कर्मचाऱ्यांनी डेअरीच्या प्रवेशद्वारावर निर्दशने करत आपल्या मागण्याची पूर्तता करण्याची मागणी केली. एक महिन्यात सर्व कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासोबतच संचालक मंडळ बरखास्त करण्याची देखील मागणी मान्य केली होती.

महानंदचा कारभार गुजरातकडे हलवला जाणार

दोन दिवसापूर्वीच सिंधुदुर्गमधील पाणबुडी प्रकल्प बाहेर राज्यात जाण्यावरून राज्यातील वातावरण तापलं होतं. राज्यातली प्रमुख सहकारी दूध संस्था महानंदचा कारभार गुजरातकडे हलवला जाणार असल्याने राजकारण तापलं होतं. प्रकल्प परराज्यात जाणार का यावर चेअरमन यांनी खुलासा केलाय. माध्यमांमध्ये प्रसारित केली जाणारे वृत्त चुकीचे असल्याचं महानंदचे चेअरमन राजेश परजणे म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT