Mahananda Dairy: मागण्या मान्य मात्र पूर्तता झाली नाही? महानंद डेअरी वाचवण्यासाठी प्रिया मिटके यांचा पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा

Mahananda Dairy News: दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन देऊन सर्व मागण्या मान्य केल्या. एक महिन्यात सर्व कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासोबतच संचालक मंडळ बरखास्त करण्याची देखील मागणी मान्य केली होती.
Mahananda Dairy
Mahananda DairySaam TV
Published On

संजय गडदे

Mumbai Goregaon Mahananda Dairy:

महाराष्ट्र राज्य दुग्धविकास महासंघाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या महानंदा दूध डेअरीची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. मागील अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार देखील मिळालेला नाही. यासाठी एका महानंद कर्मचाऱ्यांच्या पत्नी प्रिया मिटके यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mahananda Dairy
Mumbai News: नेहमी कामगार ओरडायचे, यावेळी मात्र नजर चुकवली अन् अनर्थ झाला; पतंग उडवताना गच्चीवरून पडून मुलाचा मृत्यू

प्रिया मिटके यांनी या आधी ११ डिसेंबरपासून ६ दिवस उपोषण केले होते. त्यावेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन देऊन सर्व मागण्या मान्य केल्या. एक महिन्यात सर्व कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासोबतच संचालक मंडळ बरखास्त करण्याची देखील मागणी मान्य केली होती.

मात्र दोन महिने उलटून गेल्यानंतरही लेखी आश्वासनाची पूर्तता होत नाहीये. त्यामुळे प्रिया मिटके यांनी पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचं पत्र प्रिया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.

महानंद दूध संघाच्या कर्मचाऱ्यांच्या काय आहेत मागण्या?

  • महानंद दुग्धशाळेच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे उद्दभवलेल्या समस्यांमुळे दूध महासंघ चालविण्यास असमर्थ ठरलेले संचालक मंडळ बरखास्त करुन दूध महासंघाचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमा.

  • दूध महासंघ पूर्णपणे राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड (एनडीबीबी) यांच्याकडे चालविण्यास द्यावा.

  • कर्मचाऱ्यांचे मागील ६ महिन्यांचे थकीत वेतन, फरकासह दोन वार्षिक वेतनवाढ, शासनाने जाहीर केलेले महागाई भत्ते फरकासह लवकरात लवकर द्यावे.

  • स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या ५७० कर्मचाऱ्यांना लागणारा निधी शासनाने लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात यावा.

Mahananda Dairy
Beed Crime: शेतकऱ्याला रस्त्यात अडवून ५१ लाखांची रोकड लंपास; वडवणी पोलिसांकडून तपास सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com