(सचिन बनसोड)
राज्यातील उद्योग बाहेर राज्यात जात असल्याने विरोधकांनी सरकारला नेहमीच धारेवर धरलंय. दोन दिवसापूर्वीच सिंधुदुर्गमधील पाणबुडी प्रकल्प बाहेर राज्यात जाण्यावरून राज्यातील वातावरण तापलं होतं. त्याचवेळी राज्यातली प्रमुख सहकारी दूध संस्था महानंदचा कारभार गुजरातकडे हलवला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापलंय. हा प्रकल्प खरंच गुजरातला जाणार का यावर महानंदचे चेअरमनने खुलासा करत स्पष्टीकरण दिलंय. (Latest News)
राज्यातली प्रमुख सहकारी दूध संस्था महानंदचा कारभार गुजरातमधील एनडीडीबीतून चालणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद एनडीडीबीला चालवण्यात देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलाय. संचालक मंडळाचा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय. सरकारच्या मंजुरीनंतर महानंद डेअरीविषयी निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान खरंच प्रकल्प परराज्यात जाणार का यावर चेअरमन यांनी खुलासा केलाय.
माध्यमांमध्ये प्रसारित केली जाणारे वृत्त चुकीचे असल्याचं महानंदचे चेअरमन राजेश परजणे म्हणालेत. महानंद डेअरी गुजरात जाण्यावरून परजणे म्हणाले की, एनडीडीबी संस्थेचे कार्यालय गुजरात मध्ये असल्याने तो समज झालेला असेल.परंतु संस्था आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे ती पुनर्जीवीत होईल. वाढीव कर्मचारी आणि वेतनाचा बोजा संस्थेवर आहे. व्हिआरएससाठी देखील प्रस्ताव सरकारकडे दिला होता. तोही अजून विचाराधीन आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
परंतु सरकारच्या निर्णयाला विलंब होत आहे.परंतु संस्था टिकवण्यासाठी संस्था एनडीडीबीला देण्याचा पर्यायाचा अवलंब करावा लागेल. यामुळे त्यावर सरकारने निर्णय घ्यायला हवा, असं चेअरमन म्हणालेत. पर्याय अवलंबला गेला नाही, तर महानंद आणखी अडचणीत येवून ती बंद पडू शकते, ते योग्य नाही. जर गुजरातमधून कारभार झालं तर सर्व सामान्य दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होईल, असं चेअरमन परजणे म्हणालेत.
महानंदवरून संजय राऊतांचा सरकारला इशारा
महानंदा डेअरीच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झाला आहे,असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. "आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव उघड झाला आहे. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटक सरकारची निवडणूक लढवली गेली. महानंदा त्या संदर्भात जे वास्तव मी पाहतो आहे. महानंद डेअरी गुजरातला नेण्याचा हा प्रकार सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.