भाजपचा कुठलाही नेता, कोणत्याही महिलांबाबत अभद्र शब्द वापरू शकत नाही - फडणवीस
भाजपचा कुठलाही नेता, कोणत्याही महिलांबाबत अभद्र शब्द वापरू शकत नाही - फडणवीस SaamTV
महाराष्ट्र

भाजपचा कुठलाही नेता, कोणत्याही महिलांबाबत अभद्र शब्द वापरू शकत नाही - फडणवीस

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : 'भाजपचा कुठलाही नेता आणि विशेषतः आशिष शेलार कुठल्याही महिलेबाबत अभद्र आणि चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत, महापौरांबाबत तर कधीच नाही.'' काल त्यांच्या प्रेसनोटचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.

हे देखील पहा -

तसंच आशिष शेलार (Ashish Shelar) शिवसेनेच्या विरुद्ध आक्रमकतेनं बोलतात त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी हा गुन्हा दाखल केला का? हा प्रश्न आहे. महापौर (Mayor) किंवा कुठल्याही महिलेबाबत आदर आहे. आशिष शेलार चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. असं म्हणत फडणवीसांनी शेलारांची पाठराखन केली. दरम्यान काँग्रेस (Congress) नेते नागपुरात उमेदवार बदलला काय, किंवा तोच ठेवला काय.. ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या फरकाने जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काही बाबतीत राजकारणा पासून दूर राहीलं पाहिजे, विशेषतः सेनाप्रमुख CDS यांचा विषय आहे. तिथे असे लुज वक्तव्य करण्यापेक्षा देशाची सर्वोच्च प्राथमिकता हा अपघात का झाला ही आहे. तिन्ही सेना मिळून याची चौकशी करत आहेत. चौकशी होईपर्यंत याबाबत बोलणे अनुचित आहे. असं प्रत्युत्तर त्यांनी राऊतांच्या विधानावरती दिलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: बारामतीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Weight Loss Mistakes : एक्सरसाइज अन् व्यायाम करूनही वजन काही कमी होईना? मग जाणून घ्या जाड होण्यामागचं कारण

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

SCROLL FOR NEXT