पुणे : आज पुण्यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडून शहिद जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सुवर्ण विजय द्विसप्ताहात राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग येथे 'एक सही शहीद जवानांच्या अभिवादनासाठी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या मोहिमेचा प्रारंभ थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
हे देखील पहा -
कार्यक्रमा दरम्यान बोलताना थोरात म्हणाले 'बिपीन रावत हेलिकॉप्टर दुर्घटनेत काही जणांकडून घातपाताची शक्यता वर्तवली जातेय, त्याचीही केंद्र सरकारने चौकशी करावी.' अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी OBC जागा वगळून राबवल्यास राज्यात सामाजिक तणावाची परिस्थिती बिघडू शकते, म्हणूनच सरकारने याप्रश्नी पुन्हा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला आहे, निवडणुका घ्यायच्या तर सर्वच जागांवर व्हाव्यात, ओबीसी जागा वगळून चालणार नाही असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान आरोग्य परीक्षा पेपर फुटी प्रकरणी झालेल्या कारवाईचं स्वागतच, सूञधार गजाआड गेलेच पाहिजेत असही ते यावेळी म्हणाले
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.