-- फैयाज शेख
जव्हार : एकीकडे 73वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा होत असताना दुसरीकडे मात्र प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एका मृत्यू पावलेल्या चिमुकल्याला दवाखान्याची रुग्णवाहिका (Ambulance) न मिळाल्याने 35 ते 40 किमी अंतरावर कडाक्याच्या थंडीत कुडकुडत मोटरसायकलहून मृतदेह न्यावा लागल्याची दुर्दैवी घटना पालघर (Palghar) जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथे घडली आहे.
हे देखील पहा :
पहिलीत शिकणारा मृत अजय युवराज पारधी (वय 6 वर्ष) ह्याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला उपचारासाठी 24 तारखेला त्रिंबकेश्वर येथील दवाखान्यात नेले. परंतु तेथे एक दिवसाच्या उपचारानंतर सरकारी दवाखान्यात (Hospital) दाखल करण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी त्यांना दिला. त्यानंतर अजयला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करा असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेचच जव्हार येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान 25 तारखेला रात्री 9:00 वाजता कुटीर रुग्णालयात त्याचा मृत्यू (Death) झाला.
परंतु,आर्थिक चणचणीत अडकलेल्या या कुटूंबाला मृतदेह (Death-Body) आता घरी न्यायचा कसा? असा प्रश्न उभा राहीला होता. यावेळी त्यांनी रुग्णवाहीकेसाठी विचारणा केली असता पैसे देणार असाल तरच गाडी मिळेल अशी तंबीच रुग्णवाहिका चालकांनी कुटूंबियांना दिली असल्याने मृत अजयचे वडील युवराज पारधी हे पैसे नसल्याने हताश होऊन थंडीत कुडकुडत 35 ते 40 किमी अंतरावर बाईकवर मृतदेह घेऊन गावी पायरवाडीत येथे आले. ही दुर्दैवी घटना प्रशासनाच्या कारभारावर चीड आणणारी असून या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.