balasaheb thorat Saam TV
महाराष्ट्र

गोव्यात महाविकास आघाडी नाही; काँग्रेसला बहुमत मिळणार- बाळासाहेब थोरात

प्रत्येक पक्षाला आपल पक्ष वाढवण्याचे अधिकार आहे. त्यामुळे गोव्यात तसे निर्णय घेतले असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

पणजी: गोव्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु आहे. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांसारखे काँग्रेसचे नेते गोव्यात प्रचार करत आहेत. काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी साम टीव्हीशी बोलताना गोव्यात (Goa Congress) काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे सांगितले आहे. गोव्यात आमचं सरकार येणार, बहुमत मिळणार. त्यामुळे इतर गोष्टींवर भाष्य करायची गरज नाही. प्रत्येक पक्षाला आपल पक्ष वाढवण्याचे अधिकार आहे. त्यामुळे गोव्यात तसे निर्णय घेतले असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

....ते बेछूट आरोप

लोकसभेत पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) काँग्रेसवरती टीक केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की पंडीत नेहरुंमुळे गोवा उशीरा स्वतंत्र झाला होता. या टीकेला उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, हे बेछूट आरोप आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतले गेले. शांतता मार्गाने गोवा स्वतंत्र करायचा होत, त्या निमित्ताने गोव्यातील काँग्रेसचे स्वातंत्र्यामधील योगदान कळाले. भाजपमुळे काँग्रेसने आणि नेहरूंनी किती काम केलं हा प्रचार होत आहे असेही बाळासाहेब म्हणाले.

चंद्रकांत पाटलांच्या नवीन मुहूर्ताचा आम्हाला फायदा

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले होते की येत्या १० मार्चला राज्यातील सरकार पडेल. त्यावर बोलताना थोरात म्हणाले की चंद्रकांत पाटील नवीन मुहूर्त काढतात ह्याचा आम्हाला फायदा होतो. ते गेले अडीच वर्ष मुहूर्त सांगत होते अजून अडीच वर्ष असच राहील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवावे. राऊतांनी राज्यसभा सभापतींना लिहीलेल्या पत्राबाबत बोलताना ते म्हणाले ''सरकार पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दबाव आहे, पण हे सरकार भक्कम आहे.''

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: धावत्या कारने डिव्हायडरला धडक देत घेतला पेट, ४ जण जिवंत जळाले

Kidney Stones : किडनी स्टोनचा धोका टाळायचाय? रोज प्या 'इतके' ग्लास पाणी

Cardiac Arrest First Aid: घरात कुणी अचानक बेशुद्ध पडलं तर काय कराल? पहिल्या ५ मिनिटांत करा हे ७ उपाय

Health Checkup30s: वयाच्या तिशीत येताय? या टेस्ट करा, संकट येण्याआधीच लागेल चाहूल

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT