
रश्मी पुराणिक
नवी दिल्ली: देशात सध्या हिजाब प्रकरणावरुन वातावरण तापलं आहे. कर्नाटकमध्ये काही विद्यार्थांना हिजाब घालायला बंद घातली आणि तिथुन हा वाद सुरु झाला. सध्या केंद्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यातही हा मुद्दा तापला. विरोधकांनी सरकारला चांगलचं धारेवर धरले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही लोकसभेत हिजाब प्रकरणावरुन (Hijab Controversy) सरकारला धारेवर धरले. काय कपडे घालायचे हे भाजपंच ठरवणार, काय लिहायचे हेच ठेवणार आणि आणीबाणी साठी आम्हाला बोलणार, कर्नाटकमधील एक आमदार म्हणाले कपड्यांमुळे बलात्कार वाढत आहे. हिजाब घातलं तरी विरोध, कपड्यांमुळे बलात्कार, मोरल पोलिसिंग पण भाजप करतं अशी टीका सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाजपवर केली आहे.
दरम्यान कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे आता महाराष्ट्रात देखील पडसाद पडत आहेत. हिजाब प्रकरणाचे पडसाद सोलापूर, पुणे, मुंबई, मालेगाव, अमरावती याठिकाणी पडले. कर्नाटकमध्ये हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच कोविड काळात काँग्रेस चुकीच्या पद्धतीने वागल्याचे मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते. त्याचेही पडसाद महाराष्ट्रत पडले आहेत. काँग्रेस ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. महाराष्ट्रातील मजूर बाकीच्या राज्यांमध्ये गेल्याने कोरोना वाढला असे ते यावेळी म्हणाले होते.
सुप्रिया सुळेंनी त्यांनतर पत्रकार परिषद घेवून त्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. त्यांनी पत्र समोर ठेवून मोदींच्या वक्तव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी फडणवीसांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना पाठवलेल्या पत्राचा देखील संदर्भ दिला. देशात सर्वाधिक ट्रेन्स या राज्यांतून गेल्याची माहिती सुप्रिया सुळे दिली होती. त्यांनी रेल्वे मंत्रालयाचा डेटा माध्यमांसमोर ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक श्रमिक ट्रेन्स गुजरातमधून गेल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली होती. महाराष्ट्रातून ८१७ ट्रेन्स आणि गुजरातमधून १०३३ ट्रेन्स तर पंजाब ४३० ट्रेन्स सोडण्यात आल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले होते. (Prime Minister Maharashtra state Supriya Sule).
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.