Badlapur Latest News Saam tv
महाराष्ट्र

Badlapur : बदलापूर रेल्वे स्थानकात वंदे भारतसह सर्व एक्स्प्रेस थांबणार? टर्मिनस दर्जाचा मुद्दा थेट रेल्वेमंत्रालयात पोहोचला

Badlapur Latest News : बदलापूर रेल्वे स्टेशनला टर्मिनस दर्जा द्यावा, अशी मागणी नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.

Vishal Gangurde

मयुरेश कडव, साम टीव्ही

मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनमध्ये दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. अनेकदा लोकल ट्रेनच्या डब्ब्यात प्रवाशांना उभं राहण्यासाठी देखील पुरेशी जागा नसते. मुंबईच्या तुलनेत घरांच्या किंमती कमी असल्याने कल्याणच्या पुढील भागात लोकवस्ती वाढली आहे. बदलापूरमध्येही लोकवस्ती वाढल्याचं चित्र आहे. यामुळे बदलापूर रेल्वे स्टेशनवरून लोकल ट्रेनच्या संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. याचदरम्यान, बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनस दर्जाची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

रेल्वे लोकलमधील वाढती गर्दी कमी करण्यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशनला टर्मिनसचा दर्जा देऊन येथे वंदे भारतसह इतर मेल एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केली होती. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात पडताळणी करून कार्यवाही करण्याची विनंती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे केली आहे.

बदलापूरची लोकसंख्या 4 लाखांच्या घरात पोहचली आहे. या शहरात बहुतांश नोकरदारवर्ग आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लोकलमधली गर्दी वाढत आहे. अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. गर्दी नियंत्रणासाठी उपाय म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केली होती. तसेच बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.

'प्लॅटफॉर्मची मागणी वाढवून याठिकाणी बदलापूर-पुणे दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सेवा आणि सकाळी तसेच संध्याकाळी गर्दीच्या वेळी सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस सारख्या महत्त्वाच्या गाड्यांना बदलापूर येथे थांबा द्यावा, अशीही मागणी पातकर यांनी केली आहे. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पत्रव्यवहार केलाय.

राम पातकर यांच्या मागणीनुसार बदलापूरला टर्मिनसचा दर्जा देऊन याठिकाणी एक्स्प्रेसला थांबा देणं शक्य आहे का? याबाबत पडताळणी करून कार्यवाही करण्याची विनंती नितीन गडकरी यांनी रेल्वेमंत्र्यांना केली आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री आता याबाबत काय निर्णय घेतात? याकडेच बदलापूरकरांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, लक्ष्मी अन् पितर दोन्ही होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update: नांदेडच्या मुखेड शहरात भीषण अपघात, 7 ते 8 जण गंभीर

Shocking : पत्नीला अंघोळ करताना तरुणाने पाहिलं, व्हिडीओ बनवून पती विषारी औषध प्यायला अन् पुढे...

बस झालं ना दादा... अजित पवारांसामोरच धनंजय मुंडे संतापले | VIDEO

Husband Wife Clash : नवरा गाढ झोपेत, बायको दबक्या पावलाने आली अन् अंगावर ओतलं उकळतं पाणी; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT