Russia Alliance Opposition : घातक युती, युद्धाची सावली; चार देश एकत्र येणार,रशियाला घेरणार, VIDEO

Russia Alliance Opposition update : इराणनंतर आता रशियाविरोधात बलाढ्य देशांनी युती केलीय... मात्र हे बलाढ्य देश कोणते आहेत? आणि या देशांनी रशियाला घेरण्यासाठी काय प्लॅन आखलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Russia Alliance Opposition
Russia Alliance OppositionSaam tv
Published On

अमेरिकेच्या एका निर्णयामुळे रशियाचं टेन्शन वाढलंय. अमेरिकेच्या या घातकी निर्णयानं जगाची शांतता पुन्हा धोक्यात आलीये. आता ट्रम्प यांनी पुन्हा पुतीन यांच्या विरोधात बाह्या सरसावल्या आहेत. युक्रेनच्या खांद्यावर बंदुका ठेवून अमेरिका युद्ध लढणारेय. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथमच युक्रेनला घातक शस्त्रं पाठवण्यास मान्यता दिली. पॅट्रियट डिफेन्स सिस्टमपासून ते रॉकेट लाँचर्सपर्यंत शस्त्रांचा पुरवठा निश्चित करण्यात आला आहे. यापुर्वी बायडेन सरकारनं युक्रेनला मदत केली होती सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलाय. अमेरिका कोणकोणती शस्त्रं युक्रेनला पाठवून रशियाची चिंता वाढवणारेय पाहूया..

Russia Alliance Opposition
Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

युक्रेनला मिळणारी घातक शस्त्र

गाइडेड मल्टिपल रॉकेट लॉन्चर सिस्टम

१५५ मिमीच्या घातक आर्टिलरी शेल्स

पॅट्रियट डिफेन्स सिस्टम देणार

सुमारे २ हजार ५०० कोटी रुपयांची शस्त्र

Russia Alliance Opposition
Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ट्रम्प यांनी शांततेसाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. पण झुकतील ते पुतिन कसले? पुतिन यांनी कुठलीही नरमाई न दाखवता युक्रेनवरील हल्ले वाढवले. म्हणूनच आता प्रत्युत्तर म्हणून ताकद दाखवली जाईल असं म्हणत अमेरिकेनं भूमिका स्पष्ट केली. रशियाविरोधात एक मोठी लष्करी आघाडी उभी राहत आहे, जवळजवळ चार बलाढ्य देशांनी रशियाविरोधात नवे आंतरराष्ट्रीय युती केलीये.

Russia Alliance Opposition
Train Accident : कर्जत-लोणावळाजवळ रेल्वेचा अपघात; मालगाडी रुळावरून घसरली, VIDEO

रशियाविरोधात आंतराष्ट्रीय युती

अमेरिका

ब्रिटन

फ्रान्स

कॅनडा

रशियाविरोधात हे 4 देश रणनीती आखत आहेत. यामुळे रशियाच्या लष्करी तळांवर हवाई हल्ल्यांची शक्यताही चर्चेत आहे. गेल्याकाही दिवसांपुर्वी अमेरिकेनं थेट इराणवर हल्ला चढवत त्यांच्या अणूभट्ट्या उद्धवस्त केल्या त्यामुळे जगातील शांतता धोक्यात आली होती आणि आता तर नाटो देशांना अमेरिका आपली शस्त्रं पुरवून रशियाविरोधात खुल्लमखुल्ला आघाडी घेतेय. परिस्थिती चिघळवण्याचं काम अमेरिका करत असून त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशाराच रशियानं दिलाय. त्यामुळे आता हे युध्द पेटले तर ते सूडाचं युध्द असेल आणि यात पुन्हा जग होरपळून निघेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com