गोंदिया : सेलसुरा (wardha) गावाच्या नदीत कार कोसळून सात जणांचा नुकताच अपघाती मृत्यू झाला हाेता. हे सातही सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यलयाचे मेडिकलचे विद्यार्थी हाेते. यामध्ये गोंदिया जिल्हाचा तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय राहंगडाले (vijay rahangdale) यांच्या मुलगा अविष्कार रहांगडाले (avikshar rahangdale) याचा समावेश होता. आमदार विजय राहंगडाले यांना सांत्वन भेट देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्या घरी येताहेत. आज (रविवार) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी सहकुटूंब राहंगडाले कुटूंबियांची भेट घेत सांत्वन केले.
यावेळी गडकरी (nitin gadkari) यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले अपघात कसा झाला त्यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे. तांत्रिक कारण तसेच रोड इंजिनियरचे कारण तर नाही ना तसेच ऑटोमोबाईलच्यामुळे तर हे अपघात झाले तर नाहीना या सगळ्यांची चौकशीचे आदेश दिले आहे. आम्हाला रोड सेफ्टी (road safety) बद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल असेही गडकरींनी नमूद केले.
देशात वर्षभरात पाच लाख अपघात होतात. साडेतीन लाख लोक अपघातात (accident) मृत्यू पावतात.यावर तामिळनाडू सरकारने आपल्या राज्यात ५० टक्के अपघातावर नियंत्रण मिळविले असुन ५० टक्के अपघात मृत्यूवर नियंत्रण केलेले आहे. महाराष्ट्रात (maharashtra) कशा प्रकारे अपघात आम्ही टाळू शकतो याचे उपाययोजना करणे गरजचे असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.
वर्धा (wardha) येथे झालेले अपघात ही घटना खूप दुर्भाग्य पूर्ण आहे. रहांगडाले परिवारा सोबत माझे घरगुती संबंध आहेत म्हणून आज इथे आपल्यासह परिवारा सोबत त्यांच्या कुटुबियांना भेट देण्यासाठी आलाे. रहांगडाले कुटुबियांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे अशीच प्राथना करतो असेही गडकरी यांनी नमूद केले
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.