ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची (thane muncipal corporation election) धामधुम सुरु होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुढील महिन्यात म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर करण्याच्या सुचना राज्य निवडणुक आयोगाने ठाणे महापालिकेला (thane muncipal corporation) दिलेल्या पत्रात केल्या आहेत.
त्यानंतर महिनाभरात महापालिका क्षेत्नातील प्रभागांच्या सीमा २ मार्च नंतर निश्चित होण्याची शक्यता असून त्यानंतरच ख:या अर्थाने महापालिका निवडणूकीचे (thane muncipal corporation election) बिगुल वाजले जाणार आहे. एकूणच एप्रिल अखेर र्पयत महापालिकेच्या निवडणूका लागण्याची शक्यता यातून दिसत आहे. त्यातही राज्य निवडणुक आयोगाने (election commission) सादर केलेल्या पत्रात प्रभाग क्रमांक ४४ हा सर्वाधिक मोठा वॉर्ड असणार असून येथून पालिकेवर चार नगरसेवक निवडून जाणार आहेत.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार ठाणे (thane) महापालिकेने यापूर्वीच प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यानुसार प्रभागांची संख्या, एकूण लोकसंख्या तसेच सदस्यसंख्या देखील निश्चित करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत (obc reservation) सर्वच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या सोडून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या देखील निश्चित करण्यात आली आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.