Nitesh Rane, Kokan News,  saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane News : सरपंच निवडीवरुन मतदारांना उघडपणे धमकी; नितेश राणे म्हणतात...

ज्याला आपला मतदारसंघ कोठुन कोठे पर्यंत आहे हे माहिती नाही त्याने बाेलू नये असे राणेंनी ठाकरेंना सुनावले.

संभाजी थोरात

Nitesh Rane News : माझे गावातील लोक माझे आहेत. त्यांच्याशी मी कसे बोलायचे हे मी ठरवेन अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी ग्रामपंचायतीत जर सरपंच जिंकला नाही तर एक रुपयाचाही निधी देणार नाही या त्यांनी उघडपणे दिलेल्या धमकीच्या प्रश्नावर माध्यमांशी बाेलताना आज स्पष्ट केले. (Maharashtra News)

सातारा जिल्ह्यातील पाटण येथे आज हिंदूत्ववादी संघटनांतर्फ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले हिंदुवरील अत्याचार वाढले असल्याने मोर्चा काढला आहे. अजुन काही पोलिस (police) अधिकाऱ्यांना वाटते महाविकास आघाडीचे (mva) सरकार आहे.

दरम्यान नांदगाव येथील बैठकीत तुम्ही तुमच्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर एक रुपयाचा निधी देणार नाही अशी एक प्रकारे धमकी दिल्याची चर्चा आहे या प्रश्नावर राणे म्हणाले माझे गावातील लोक माझे आहेत. त्यांच्याशी मी कसे बोलायचे हे मी ठरविन असे राणेंनी स्पष्ट केले.

नितेश राणे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांच्यावर मला बोलायचं नाही या आदि्त्य ठाकरे यांचे प्रतिक्रियेविषयी राणेंना विचारले असता त्यांनी ज्याला आपला मतदारसंघ कोठुन कोठे पर्यंत आहे हे माहिती नाही. वरळी (worli) का दिनो मारियाचे घर हेही माहिती नाही. आदित्य ठाकरे स्वत: घाण असल्याने त्यांना सर्व घाण दिसते असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT