Nitesh Rane Comment On CM Warning Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane: मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, ते मला काय बोलणार? तंबी दिल्याच्या वृत्तावर राणेंची प्रतिक्रिया

Nitesh Rane Comment On CM Warning : नितेश राणे यांच्या विधानांमुळे नागपूरमध्ये दंगल झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Bharat Jadhav

माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार? चिंता करायची नाही, अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याच्या वृत्तावर दिलीय. राज्यात औरंगजेबच्या कबरीचा वाद पेटला असून नागपुरात दंगल भडकली आहे. याला नितेश राणे यांच्या भडकाऊ विधान जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. त्यावरून आज मुख्यमंत्री फडणवीसांनी राणेंना तंबी दिली असल्याचं सांगितलं जातंय.

मात्र आपल्याला मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली नाही, तर मी त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं, असं नितेश राणे म्हणालेत. 'मुख्यमंत्र्यांच्या (CM Fadnavis) लाडक्या मंत्र्यांमध्ये मी आहे. 'माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार? चिंता करायची नाही ,असं राणे म्हणालेत. छत्रपती संभाजीनगरमधील मुघल शासक औरंगजेबची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून केली जातेय. सोमवारी दिवसा राज्यातील अनेक ठिकाणी दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलने केली.

त्यानंतर सोमवारी रात्री नागपूरमध्ये दोन गटात दंगल उसळली. नागपूरमधील महल परिसरात दोन गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक केवी. या दंगलीवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय. भाजप मंत्री नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानामुळे दंगली भडकली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. राणेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी होतेय. दंगल भडकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्री नितेश राणेंवर संतपाले. त्यावर राणेंनी प्रतिक्रिया दिलीय.

माझा राजीनामा कोणी मागितला नाही

'मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये मी आहे. माझे मुख्यमंत्री मला काय बोलतील? त्याची चिंता करायची नाही. माझ्या तोंडी कोणी लागू नये, असा टोला नितेश राणेंनी विरोधकांना लगावला. भाजपला महाराष्ट्राला पेटता मणिपूर करायचा आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता, त्यावरही राणेंनी उत्तर दिलंय.

त्या व्यक्तीला पेटवणे काय हे माहिती नाही. त्यांना आधी कंठ तरी फुटू द्या, असा टोला नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना लागवलाय. नितेश राणे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावरून बसून आंदोलन केलं. त्यावरही राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. सभागृहाबाहेर काय झाले त्याला मी उत्तर देत नाही. सभागृहात कोणीही माझा राजीनामा मागितला नाहीये. तर मी त्यांना तेथे उत्तर दिलं असतं. पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांना नाश्ता द्या. मत्स खात्याचा मंत्री आहे, मी त्यांना मासे पाठवतो, असं म्हणत नितेश राणेंनी विरोधकांना टोला लगावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT