Mla Nitesh Rane, Karad saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane : क-हाडातील स्फाेट गॅस सिलेंडरचा नव्हे, बाॅम्ब निर्मितीचा नितेश राणेंना संशय; एटीएसच्या तपासाची मागणी

या स्फोटाबाबत तपास करणाऱ्या अधिकारी यांच्याशी राणेंनी चर्चा केली.

Siddharth Latkar

Karad News : गृहखाते बदनाम हाेणार असेल तर ते खपवून घेणार नाही. एटीएसच्या माध्यमातून कराड तालुक्यातील स्फाेटाचा तपास व्हावा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी कराड येथे केली. दरम्यान हिंदु समाजाच्या विराेधात काेण वागत असेल तर लाेकप्रतिनिधींचा देखील पाणउतारा केला जाईल असा सज्जड इशार राणेंनी कराड येथे दिला.(Maharashtra News)

सातारा जिल्ह्यातील कराड येथील मुजावर कॉलनी येथे मागील आठवड्यात झालेल्या स्फ़ोटामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. या स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचीही राणे यांनी पाहणी केली. या स्फोटाबाबत तपास करणाऱ्या अधिकारी यांच्याशी राणेंनी चर्चा केली.

राणे म्हणाले उद्या येथे बाॅम्ब तयार हाेत असतील आणि त्याला गॅस सिलेंडरच्या नावाखाली खपविणार असाल तर ते चालू देणार नाही. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्रास द्याल तर साेडणार नाही असा इशारा राणेंनी केली. आगामी काळातील अधिवेशनात याबाबत आवाज उठविणार असल्याचे राणेंनी नमूद केले. नेमके काेण दबाव आणत आहेत या प्रश्नावर राणे म्हणाले मी अधिवेशनात बाेलेन तेथे नाेंद हाेईल असेही राणेंनी म्हटले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

SCROLL FOR NEXT