Nitesh Rane, Uddhav Thackeray, Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Nitesh Rane News : 'मविआ' त उद्धव ठाकरेंची अवस्था सरदारासारखी : नितेश राणे

Nitesh Rane on Uddhav Thackeray: नितेश राणेंनी आज (साेमवार) माध्यमांशी संवाद साधला.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा (balasaheb thackeray) एक वेगळा रुबाब होता. मोठ्यातला मोठा नेता, कलाकार मातोश्रीवर यायचा, बाळासाहेब ठाकरे यांना नमस्कार करायचा आणि मगच मुंबईत यायचा. परंतु काल (रविवार) उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना जी वागणूक मिळाली त्यावर त्यांनी विचार करावा. भाजपा सोबत असताना उद्धव ठाकरेंना जो मान होता. तो काल दिसला नाही अशी टिप्पणी आमदार नितेश राणे (mla nitesh rane) यांनी रविवारी महाविकास आघाडीच्या बैठकीवर केली. सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात राणेंनी आज (साेमवार) माध्यमांशी संवाद साधला.

(Maharashtra News)

नितेश राणे म्हणाले भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे यांचा सन्मान होता. आता महाविकास आघाडीत ठाकरेंची अवस्था सरदारासारखी झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्याचा प्लॅन उद्धव ठाकरे यांचा होता असा गंभीर आराेप करीत याबाबत पोलिसांनी तपास करावा त्यांची नार्काे टेस्ट करावी अशी मागणी राणेंनी केली आहे.

या पत्रकार परिषदेत नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले संजय राऊत हे नाना पाटोलेंच्या बाजूला बसले हाेते. तेथेच राऊत हे काँग्रेसचा अपमान करीत हाेते. त्याचबरोबर राऊत हे महाविकास आघाडीतील शकुनी मामा, नारद मुनी आहे असे राणेंनी म्हटलं. कर्नाटकात हिरवे झेंडे फडकवले गेले. काँग्रेस कुणाला खुश करत आहे ? असा प्रश्न उपस्थित करुन पाकिस्तानला तुम्ही खूश करीत आहेत असा सवाल राणेंनी काॅंग्रेजनांसमाेर उपस्थित केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत वाहतूकीत बदल; काही मुख्य रस्ते बंद, तर काही वन वेवर सुरू

Maharashtra Elections : झेडपींआधी महापालिका निवडणुका? लवकरच घोषणा

Solapur: ८ वर्षे सोबत राहिले, पण प्रेमात धोका मिळाला, तृतीपंथीयाने आयुष्य संपवलं; आत्महत्येपूर्वी व्हिडीओ काढला अन्...

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

SCROLL FOR NEXT