Nitesh karale :  Saam tv
महाराष्ट्र

Nitesh karale : कराळे मास्तरांना बेदम मारहाण; भाजप कार्यकर्त्याने कॉलर धरली, कानफटात लगावल्या, VIDEO

BJP party worker beaten to nitesh karale : नितेश कराळे यांना वर्ध्यात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्धा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान वर्ध्यातून मोठी बातमी समोर आली आहे. वर्ध्यात शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती नितेश कराळे यांनी दिली. या मारहाणीनंतर कराळे मास्तरांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. वर्ध्यात भर रस्त्यात भाजप कार्यकर्त्यांनी नितेश कराळे यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. कराळे मास्तरांच्या मांडवा गावात त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीनंतर कराळे मास्तर सावंगी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.

मारहाणीनंतर नितेश कराळे म्हणाले, 'मी गावात मतदानासाठी गेलो. मतदान करून आलो. माझ्या गावातून येताना नेहमीच्या ठिकाणी थांबलो. तिथे काँग्रेसच्या बुथवर थांबलो. त्याआधी पोलिसांची गाडी येऊन गेली होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी बुथवरील लोकांना दोन खुर्च्या ठेवण्यास सांगितल्या होत्या. मात्र, तिथे आठ-आठ खुर्च्या टाकून लॅपटॉप घेऊन बसले होते. माझे कार्यकर्त्यांनी त्याबाबत सांगितले. त्यानंतर मी पोलीस अधिकारी काकडे साहेबांना फोन केला. त्यावेळी गावातील एक जण लॅपटॉपसह बसला होता'.

'पक्षाचा बुथ असल्याने तिथे बसता येत नाही. मात्र, गावातील एक सरकारी कर्मचारी जण लॅपटॉपसह बसला होता. सचिन नावाच्या या कर्मचाऱ्याने मला मारहाण केली. मी एकही शब्द बोललो नाही. त्याने कॉलर पकडून हल्ला केला. भाजपचे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. माझ्या कुटुंबासहित मी येत होतो. मला लहान मुलगी आणि पत्नीलाही धक्काबुकी झाली, असे कराळे मास्तर पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT