Maharshtra Politics: कराळे गुरूजींनी सातव्यांदा घेतली शरद पवारांची भेट; २५ किंवा २६ तारखेला अंतिम निर्णय होण्याची शक्यता

Karale Guruji Meet Sharad Pawar: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कराळे गुरूजी आणि शरद पवार यांच्यातील भेटीगाठीचं सत्र वाढलेलं आहे. आज सातव्यांदा विदर्भातील कराळे गुरूंजींनी शरद पवारांची भेट घेतली आहे.
Karale Guruji Meet Sharad Pawar:
Karale Guruji Meet Sharad Pawar:Saam Tv
Published On

अक्षय बडवे

Maharshtra Politics Lok Sabha Election

आज नितेश कराळे (कराळे गुरुजी) यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. कराळे गुरूजी वर्धा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी आज पुण्यामध्ये शरद पवारांची सातव्यांदा भेट घेतली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कराळे गुरूजी आणि शरद पवार यांच्यातील भेटीगाठीचं सत्र वाढलेलं (Karale Guruji Meet Sharad Pawar) आहे. (latets political news)

याबेळी माध्यमांशी बोलताना कराळे (Nitesh Karale) गुरूजी म्हणाले की, शरद पवारांना (Sharad Pawar) आम्ही मतदारसंघात कसे काम विचारू असं विचारलं असता त्यांनी आम्हाला तुम्ही काम करा असे सांगितलं. याबाबत २५ किंवा २६ तारखेला अंतिम निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. लोकसभा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती कराळे गुरूजींनी दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमर काळे तयारीला लागले आहेत. परंतु, अजून अंतिम निर्णय झालेला नाही. ते काँग्रेसचे नेते आहेत, पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला गेली आहे. अमर काळे यांची काय (Pune Lok Sabha Election 2024) गॅरंटी? असा सवालही नितेश कराळे यांनी केला आहे.

माझा पक्षप्रवेश अजून बाकी आहे. मी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहील, असा शब्द शरद पवार यांना दिला आहे, असं कराळे गुरूजींनी सांगितलं आहे. तसंच ते म्हणाले की, मी आधी पक्ष प्रवेश करणार आणि मग उमेदवारी घेणार. मी महा विकासआघाडीचं काम करतोय.राज्यातील कुठलाच आमदार खासदार सरकार विरोधात बोलत (Lok Sabha Election 2024) नाही. मला कोणाचीही भीती नाही. मी डेटा अॅनालिसीस केल्याशिवाय बोलत नाही, असंही कराळे गुरूजी म्हटले आहेत.

Karale Guruji Meet Sharad Pawar:
Solapur Politics: उद्धव ठाकरेंची ताकद वाढली, भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

कराळे गुरुजी वर्धा लोकसभेच्या आखाड्यात? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कराळे गुरूजी वर्धा लोकसभा संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक (Lok Sabha 2024) आहेत. पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल, तर मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक नक्की लढवेल, असं मागील भेटीच्या वेळी कराळे गुरूजींनी सांगितलं होतं.

अस्सल वैदर्भीय भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणाऱ्या नितेश कराळेंची विदर्भात चांगलीच छाप (Maharshtra Politics) आहे. लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांची अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहे.

Karale Guruji Meet Sharad Pawar:
Raigad Politics: रायगड लोकसभेवरुन महायुतीत वादाच्या ठिणग्या; शिंदे गटाच्या आमदारांचा सुनील तटकरेंना इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com