Maharashtra Assembly Election Voting News : राज ठाकरेंच्या मनसेचा महायुतीला जाहीर पाठिंबा, असा मेसेज वरळी मतदारसंघात व्हायरल झालाय. त्यानंतर वरळीमध्ये शिंदे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मसेज व्हायरल करणाऱ्या शिंदेंच्या कार्यकर्त्याला जोरदार चोप दिला. (MNS And Shinde Group Rada In Worli) कॉलर पकडत त्याला धक्के मारत बाहेर काढलाय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. फेक मेसेजवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत यंदा तिरंगी लढत होत आहे. मनसेकडून संदीप देशपांडे, शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतादानाच्या २४ तास आधीच वरळीमध्ये मनसेच्या नावाने मेसेज व्हायरल झालाय. मनसेचा महायुतीला पाठिंबा असल्याचा मेसेजमध्ये दावा कऱण्यात आला होता. हा मेसेज व्हायरल होताच, मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक रुप घेतलं, त्याशिवाय मेसेज व्हायरल करणाऱ्यांना पकडून मारले.
राज ठाकरे काय म्हणाले ?
विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पाठिंबा दिल्याचा खोटा मेसेज व्हायरल केले जात आहेत. आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिली आहे.
संदीप देशपांडे यांची संतप्त प्रतिक्रिया -
फेक मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी वरळीतील मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, वरळीत अत्यंत नीच राजकारण सुरू आहे. लोकसभेमध्ये मनसेनं शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. किमान त्याची काहीतरी राखा, असा संताप संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला.
मदत करू शकत नाही तर फालतू आणि विष राजकारण करू नका. शिंदे गट आणि ठाकरे गट यांची मिलीभगत तर नाही ना? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. वरळीमध्ये मनसेला वाढता पाठिंबा पाहता यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पोलीस यंत्रणा कितपत कारवाई करेल याबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो. जर कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करून दाखवा, असे संदीप देशपांडे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.