Maharashtra Heat Wave Updates   Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Heat Wave: महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे

२ वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संकट होते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: २ वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संकट होते. आता लसीकरण ही मोठ्या वेगाने सुरू आहे आणि कोरोना बाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. कोरोनाच्या (Corona) या संकटातून मुक्तता होत असताना आता महाराष्ट्रावर २ नवी संकट उभारले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये (state) उष्णतेची लाट बघायला मिळत आहे. तापमानामध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. यातच आता पुढील ५ दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ५ दिवसामध्ये राज्यात काही जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे. (Maharashtra Heat Wave)

हे देखील पहा-

यानुसार, २९ मार्च २०२२ दिवशी बुलढाणा, अकोला आणि अमरावती या ३ जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून ३० मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला असतानाच दुसरे संकट महाराष्ट्रावर (Maharashtra) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ते म्हणजे वीज पुरवठा खंडित होण्याचे आहे.

राज्यात वीज कर्मचारी २ दिवसांच्या संपावर गेले आहेत. आज वीज कर्मचारी संघटना आणि ऊर्जामंत्री यांच्यामध्ये एक बैठक होणार होती. मात्र, वीज कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवल्याने ऊर्जामंत्र्यांनी आपली नियोजित बैठक रद्द करण्यात आली आहे. तसेच वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. वीज कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्याबरोबरच संपामुळे राज्यात कोळसा पुरवणारी साखळी खंडीत झाली आहे. यामुळे राज्यावर विजेचे संकट आले आहे. राज्य वीज कर्मचाऱ्यांचा संप सुटला तरी लोडशेडिंगचे संकट मिटणार नाही. कारण कोल इंडियाच्या युनियन देखील संपावर गेले आहे.

यामुळे पुढील २ दिवस राज्याला कोणताही कोळशाचा पुरवठा होणार नाही. परिणामी महानिर्मिती आणि एनटीपीसी दोघांचे औष्णिक विद्युत केंद्र कोळसा अभावी प्रभावित होणार आहे. महानिर्मिती रोज कोल इंडिया कडून १ लाख ३० हजार मॅट्रिक टन कोळसा विकत घेण्यात येत आहे. २ दिवस यातला १ टन कोळसा महानिर्मितीला मिळणार नाही. यामुळे राज्यात पारस, नाशिक, परळी आणि भुसावळ या केंद्रावर १९०० MV वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती एनटीपीसीच्या केंद्राची आहे. राज्य सरकारला रोज ५ हजार मेगावॅट वीज मिळते. मात्र, कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्यांची वीज निर्मिती देखील प्रभावित होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Crash : महिला वकिलाचे कारवरील नियंत्रण सुटले, रिव्हर्स घेताना अपघात; घटनेचा Video Viral

काँग्रेसला भाजपचा मोठा झटका; माजी राज्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ' | Politics

Maharashtra Live News Update: रस्त्याच्या वादातून तणाव! खेड तालुक्यात जैदवाडीत दगडफेक आणि वाहनांची तोडफोड

Shirvale Recipe : मॅगीसारखा दिसणारा कोकणातला हा पदार्थ कोणता? वाचा परफेक्ट शिरवाळ्याच्या पीठाची रेसिपी

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा आठवा अध्याय कोणती शिकवण देतो?

SCROLL FOR NEXT