Russia Ukraine War: 5 हजार लोकांच्या मृत्यूनंतर स्मशान बनलं युक्रेन येथील मारियुपोल शहर

युक्रेन आणि रशिया मधील युद्धाचा आज ३४ वा दिवस आहे.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: युक्रेन आणि रशिया मधील (Ukraine and Russia War) युद्धाचा आज ३४ वा दिवस आहे. रशियाकडून सतत हल्ल्यामुळे युक्रेन आता हैराण झाले आहे. अनेक शहरे देखील उद्ध्वस्त झाली आहेत. पण मारियुपोलमध्ये सर्वात मोठी शोकांतिका घडली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, या शहरामध्ये रशियन हल्ल्यात (attack) ५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक देखील बेघर झाले आहेत. रुग्णालये जखमींनी भरली आहेत. सध्या परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, उद्यान आणि शाळांमध्ये मृतांचे दफन केले जात आहे. रशियाने (Russia) इथे एवढा विध्वंस केला आहे की, ९० टक्के इमारती (Buildings) अतिशय घाण बदलल्या आहेत. तर ४० टक्के इमारती अशा आहेत की त्या पूर्णपणे जमिनीवर आहेत.

हे देखील पहा-

ज्यामध्ये रशियाने पहिल्यांदा युद्धविराम जाहीर केला होता. युद्धामध्ये अडकलेल्या लोकांना येथून बाहेर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यासाठी मानवी कॉरिडॉर बांधण्यात येत आहे. सुरक्षित रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. जेणेकरुन लोकांना येथून सहज बाहेर पडता येणार आहे. पण संपूर्ण घटना उलटी घडली आहे. कारण या शहरात (city) रशियन सैनिक रस्त्यावर उतरले आणि लोकांवर अंदाधुंद हल्ले करण्यात आले आहेत. रशियन विमानांनी इतके हवाई हल्ले केले की घरांमधून धूर निघताना दिसत आहे. युक्रेनने मारियुपोलच्या विध्वंसाची तुलना सीरियातील अलेप्पोशी करण्यात आली आहे. यामुळे मृतांना स्मशानभूमीत नेणं कठीण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Russia Ukraine War
अमेरिकेच्या हायवेवर भीषण अपघात; एका पाठोपाठ ६० वाहने धडकली...(पहा Video)

यामुळे उद्यान आणि शाळांमध्ये मृतदेह पुरले जात आहेत. यावेळी, मारियुपोलमधील दळणवळण सेवा देखील ठप्प झाली आहे. लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलता येत नाही. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी लोकं सोशल मीडियाचा (Social media) अवलंब करत आहेत. युद्धाच्या सुरुवातीला रशियानं कीवला लक्ष्य केलं. सतत हल्ले होत होते. केवळ लष्करी तळांना लक्ष्य करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण रशियन सैन्याने केवळ लष्करी तळच नव्हे, तर निवासी भागांना देखील लक्ष्य केले आहे. कीवनंतर खार्किवची वेळ आली, तिथे रशियाने अंदाधुंद हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, पण सर्वात धोकादायक दृश्य मारियुपोलचे होते. मारियुपोलमध्ये रशियाने शहराला राजधानी कीवशी जोडणारा पूल देखील नष्ट करण्यात आले आहेत . जसजसे युद्ध वाढत गेले, तसतसे रशियन सैन्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवेश केला आणि कहर केला आहे. मारियुपोलच्या महापौरांच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, आम्ही आमचे ५ हजार लोक गमावले आहेत. हसणारे शहर उद्ध्वस्त झाले आहे. येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ९० टक्के इमारती पडक्या झाल्या आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com