कैलास चौधरी -
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Osmanabad DCC Bank) अध्यक्षपदाच्या निवडीवरून उस्मानाबादेत महा विकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे शिवसेनेला बाजूला सारत काँग्रेस-राष्ट्रवादीने बँक आपल्या ताब्यात घेतली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बापूराव पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मोठे हे निवडून आले आहेत. बापूराव पाटील यांना 11 मते तर मधुकर मोटे यांना 11 मते पडली असून शिवसेनेचे एक मत फुटले असून शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ 4 मते पडली आहेत.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला सारले
बँकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (Shivsena Congress and NCP) यांनी एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून भाजपच्या विरोधात ही निवडणूक लढवली होती अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये ऐनवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला सारले एका दिवसापूर्वीच शरद पवार (Sharad pawar) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेसच हा फॉर्मुला ठरला असल्याची चर्चा असून शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.