latur shocking news  Saam tv
महाराष्ट्र

निवडणुकीचं मैदान मारलं, पण नियतीने हरवलं; राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

latur shocking news : राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगरसेविका शाहूताई कांबळे यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vishal Gangurde

लातूरमध्ये घडली धक्कादायक घटना

नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचा निधन

नगरसेविकेच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचं वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. लोकप्रतिनिधीचा वेळेत उपचार न मिळाल्याने आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. शाहूताई कांबळे यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

शाहूताई कांबळे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका होत्या. त्यांना आज पहाटेच्या सुमारास अचानक छातीत दुखू लागलं. त्यांना तातडीने रुग्णालयासाठी दाखल करण्यासाठी नेले. मात्र, पहाटेच्या सुमारास अनेक खासगी रुग्णालयात वेळेत डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत.

नगरसेविका कांबळे यांचे नातेवाईक तब्बल तासभर उपचारासाठी डॉक्टरांचा शोध घेत राहिले. शेवटी पर्याय नसल्याने शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. शाहूताई यांची उपचाराआधीच प्राणज्योत मावली. नगरसेविका शाहूताई कांबळे यांना रुग्णालयात १५-२० मिनिटे उपचार मिळाले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते, अशी हळहळ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

शाहूताई कांबळे कोण होत्या?

शाहूताई कांबळे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने त्यांना उमेदवारी मिळाली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य असलेल्या शाहूताई कांबळे यांनी जिद्दीने निवडणुकीत बाजी मारली होती. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत त्या १२ मतांनी पराभूत झाल्या होत्या. मात्र, यंदा झालेल्या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.

अजित पवार यांची भावुक पोस्ट

अजित पवार यांनी पोस्ट करत म्हटलं की, नियतीसमोर माणूस कितीही कणखर असला, तरी कधी कधी तो हतबल ठरतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांच्या आकस्मिक निधनाचं वृत्त अतिशय धक्कादायक आहे. मी जनसेवेचा प्रामाणिक ध्यास असलेल्या शाहूताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खळबळ! निवडणूक मतदान तोंडावर अन् कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले मतदान ओळखपत्र, आधार-पॅनकार्ड

Maharashtra Live News Update : नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा; भाजप उमेदवाराच्या समोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला? व्हिडिओ व्हायरल

आम्ही राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पाठिशी; क्राइम ब्रांचच्या कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Vijay Hazare Trophy: सेमीफायनमध्ये या ४ टीम्सने मारली दणक्यात एन्ट्री; पाहा कुठे आणि कधी रंगणार सामने

SCROLL FOR NEXT