नारायण राणे यांच्यासह नवनिर्वाचित मंत्र्यांनी स्वीकारला कार्यभार   Twitter/@ANI
महाराष्ट्र

नारायण राणे यांच्यासह नवनिर्वाचित मंत्र्यांनी स्वीकारला कार्यभार

मला मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) झाल्यानंतर आज सर्व नवनिर्वाचित मंत्री आपापल्या खात्याचा कार्यभार स्वीकारताना दिसत आहेत. नारायण राणे (Narayan rane) यांनी देखील नुकताच आपल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्रीपदाचा (Micro, small and medium enterprises) कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी मध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''मला मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. देशाचा जीडीपी (GDP) कसा वाढवायचा आणि देशातील तरुणांना रोजगार कसा मिळाला पाहिजे, याचा मी विचार करेन, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. यापूर्वी, केंद्रातील लघु आणि मध्य उद्योग खात्याचा कार्यभार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे होता. (The newly elected ministers, including Narayan Rane, took charge of their department)

त्याचबरोबर, नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीदेखील आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारला. भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते सोपविण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनीदेखील पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्याठिकाणी नवीन शिक्षण व कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधानही तिथे उपस्थित होते. या मंत्रालयाच्या कामाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रत्येक नागरिकावर परिणाम होत असतो, त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांसारखे कार्य करणे आणि त्यांच्याद्वारे सुरू केलेले चांगले कार्य चालू ठेवणे हे माझ्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. असे मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले आहे.

तर मीनाक्षी लेखी, परराष्ट्र मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. '' जगाने भारताची संस्कृती जाणून घेणे आणि देशातील लोकांनाही ही संस्कृती ठाऊक असणे हे परराष्ट्र धोरण आहे. जगासाठी भारताने बरेच काही केले आणि ही इतकी जुनी सभ्यता आहे की त्याबद्दल सर्वांना माहित असले पाहिजे. असे मीनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, माननीय पंतप्रधानांनी मला आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. आरोग्यमंत्री म्हणून मी पंतप्रधानांच्या अपेक्षेनुसार काम करण्याचा प्रयत्न करेन, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे.

यांच्याशिवाय, जी किशन रेड्डी यांनी संस्कृति और पर्यटन मंत्रीपदाचा, किरेन रिजिजू यांनी कायदा आणि न्याय मंत्री पदाचा, दर्शन विक्रम जरदोश यांनी रेल्वे खात्याच्या, अश्विनी वैष्णव यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रीपदाचा कारभार स्वीकारला.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT